बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ यांनी सप्टेंबरमध्ये लग्न केल्याची माहिती समोर आली होती. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत तेलंगणातील श्री रंगनायकस्वामी मंदिरात दोघांनी विवाह केला होता. ज्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. आता पुन्हा एकदा अदिती आणि सिद्धार्थच्या दुसऱ्या लग्नाचे फोटोही समोर आले आहेत.
पुन्हा एकदा अदिती आणि सिद्धार्थने राजस्थानमध्ये दुसऱ्यांदा विवाह केला आहे. या विवाहसोहळ्याचे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. अदिती राव हैदरीने नवीन फोटोंमध्ये लाल रंगाचा लेहेंगा घातला आहे. अभिनेत्रीने माथा पट्टी, कुंदन नेकलेस आणि लांब कानातले घातले आहेत. अभिनेता सिद्धार्थने मोती रंगाची शेरवानी परिधान केली. त्यावर त्याने लेयर्ड मोत्याच्या हार घालून आपला लूक पूर्ण केला आहे. आदिती राव हैदरी हिने सिद्धार्थसोबत तिच्या खास दिवसाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यासोबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकमेकांना धरून ठेवणे.”
View this post on Instagram
आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने यावर्षी मार्च महिन्यात त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. त्यानंतर या जोडप्याने 16 सप्टेंबर 2024 रोजी तेलंगणातील 400 वर्ष जुन्या मंदिरात लग्न केले. अदिती राव हैदरीची सिद्धार्थशी पहिली भेट 2021 मध्ये एका तेलुगू चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. ते सुरुवातीला एकमेकांचे मित्र होते. त्यानंतर हळूहळू त्यांच्या मैत्रिचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर 2023 मध्ये त्यांची लव्हलाइफ समोर आली.