आदित्यच्या ‘ओमः द बॅटल विदिन’ चित्रपटचा पहिला लूक

aditya roy film om the battle within first look launch
आदित्यच्या 'ओमः द बॅटल विदिन' चित्रपटचा पहिला लूक

बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरने आपल्या आगामी Action चित्रपट ‘ओमः द बॅटल विदिन’चा पहिला लूक चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबत त्याने चित्रपटाच्या थीमबद्दल लिहिले की, ‘लढाईचे साहस जिवंत ठेवण्यासाठीची एक लढाई.’ आदित्य रॉय कपूर या चित्रपटात वेगळा अंदाजात दिसत आहे. आदित्य या नव्या चित्रपटातील पोस्टरमध्ये तो आक्रमक लूकमध्ये दिसत आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, आदित्य रॉय याचा ‘ओमः द बॅटल विदिन’ चा पहिला लूक हा ‘वॉर’मधील हृतिक रोशनसारखा आहे. या चित्रपटात आदित्य रॉयसोबत अभिनेत्री संजना सांघी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @adityaroykapur

आदित्य आणि संजनाने चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्याची माहिती इन्स्टाग्रामवरून दिली होती. तसेच त्यांनी शूटिंग सुरू होण्यापूर्वी केक कापला होता. याचा फोटो संजनाने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. याशिवाय संजनाने क्लॅपबोडचा फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये नऊ सीन आणि क्लॅपबोर्डवर चित्रपटाचे नाव लिहिले होते. तसेच संजनाने आणखीन एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये अहमद खान, शायरा अहमद खान, कपिल वर्मासह अनेक लोक होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjana Sanghi (@sanjanasanghi96)

‘ओमः द बॅटल विदिन’ या चित्रपटाचे दिग्दर्शनाची धुरा कपिल वर्मा सांभाळत असून निर्मिती जी स्टुडिओ, अहमद खान आणि शायरा अहमद खान करत आहे. आदित्य आणि संजनाचा हा पहिला चित्रपट असून २०२१ प्रदर्शित होणार आहे. ‘ओमः द बॅटल विदिन’ या चित्रपटाच्या माध्यमातून आदित्य आणि संजनाची केमिस्ट्री पुढच्या वर्षी पाहता येणार आहे.


हेही वाचा – कंगनाच्या घरी आला नवा पाहुणा, पाहा फोटो