घरमनोरंजन'थाडम' सिनेमाच्या हिंदी रीमेकमध्ये आदित्य रॉय कपूरची वर्णी

‘थाडम’ सिनेमाच्या हिंदी रीमेकमध्ये आदित्य रॉय कपूरची वर्णी

Subscribe

'थाडम' या प्रसिद्ध सिनेमच्या रिमेची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे.

दाक्षिणात्य चित्रपटाची भूरळ आता सर्वच प्रेक्षकांवर चढली आहे. दाक्षिणात्य सिनेमाचं डबिंगच नाही तर रिमेक सिनेमाही प्रचंड गाजतात. सध्या सिनेसृष्टीत आणखी एका साऊथ सिनेमाच्या रिमेकची चर्चा रंगत आहे. ‘थाडम’ या प्रसिद्ध सिनेमाच्या रिमेकची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. फिल्म क्रिटीक तरण आदर्श यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकांऊटवर एक पोस्ट शेअर करत या सिनेमाच्या घोषणे बरोबरच सिनेमातील लिड रोल मध्ये कोणत्या अभिनेत्याची वर्णी लागली आहे. याची माहिती दिली आहे. तरण आदर्श यांनी एक फोटो शेअर केला आहे . या फोटोमध्ये मुराद खेतानी, भूषण कुमार, आदित्य रॉय कपूर डायरेक्टर वर्धन केतकर एकत्र दिसत आहेत. आदित्य रॉय कपूरच्या थाडम या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धूरा वर्धन केतकर सांभाळणार आहे. वर्धन या सिनेमा अंतर्गत आपल्या करियरला सुरूवात करणार आहे. तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार या सिनेमांच शुटींग सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

- Advertisement -

‘थाडम’ सिनेमात आदित्य सोबत कोणत्या अभिनेत्रीची वर्ण लागणार आहे अद्याप याचा खुलासा करण्यात आला नाहीये. तसेच सिनेमाच्या नावाची घोषणा देखील करण्यात आली नाहीये. पण चित्रपटाची घोषणा होताच सगळीकडे ‘थाडम’ सिनेमाची चर्चा रंगू लागली आहे. सध्या आदित्य त्याच्या आगामी प्रोजेक्ट मध्ये व्यस्त आहे. आदित्य ‘Om: The Battle Within’ या सिनेमात झळकणार आहे.


हे हि वाचा – happy birthday sanjay dutt: ‘केजीएफ चॅप्टर २’ मधील संजूबाबाचा खतरनाक लूक समोर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -