घरमनोरंजन'भोला' चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद

‘भोला’ चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि तब्बू यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत आगामी चित्रपट ‘भोला’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अजय देवगण दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 30 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, आता या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली असून अजय देवगणने स्वतः इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत अजय देवगणने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “तो तुम्हाला भेटायला येत आहे. तुम्ही तयार आहात का? तुमची तिकिटे आत्ताच बुक करा.” असं अजयने लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

दरम्यान, अजय देवगणच्या या पोस्टनंतर त्याचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी अधिक उत्सुक झाले आहेत. त्याचे चाहते या पोस्टवर अनेक कमेंट्स करत आहेत. गेल्या रविवारी अजय देवगण, तब्बूच्या ‘भोला’ चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले होते. रिपोर्ट्सनुसार, त्यादरम्यान चित्रपटाची 50 हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली होती. चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग पाहता अजय देवगणला ‘भोला’च्या अवतारात पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

काय आहे भोला चित्रपटाची कथा?

‘भोला’ चित्रपटात अभिनेता अजय देवगण एका रक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री तब्बूही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘भोला’ हा तमिळ चित्रपट ‘कैथी’चा रिमेक आहे. ‘दृश्यम 2’ नंतर या चित्रपटाद्वारे आता अजय आणि तब्बूची जोडी 9व्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा :

भाईजानला ई-मेलद्वारे धमकी, संशयिताला जोधपूरमधून अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -