घरमनोरंजनपरदेशात ‘पठाण’च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात; पहिल्या दिवशीच होणार करोडोंची कमाई

परदेशात ‘पठाण’च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात; पहिल्या दिवशीच होणार करोडोंची कमाई

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. मागील महिन्याभरापासून हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटातील गाणी आणि ट्रेलर पाहून शाहरुखचे अनेक चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. दरम्यान, अशातच आता परदेशात या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. परदेशातील अनेक प्रेक्षक चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला उत्तम प्रतिसाद देत आहेत. यामुळेच असा अंदाज लावला जातोय की, चित्रपटाची पहिल्या दिवसाची सुरुवात जबरदस्त होऊ शकते.

जर्मनी, ऑस्ट्रेलियाध्ये सुरु अॅडव्हान्स बुकिंग
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंगला जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि यूएईमध्ये सुरु झाली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवासासाठी जवळपास 50,000 किमतीची 3500 तिकिटं विकली गेली आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दुबईमध्ये शाहरुखच्या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

‘बेशरम रंग’गाण्याला विरोध
चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया सतत मांडत आहेत.

25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार चित्रपट

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.

 


हेही वाचा :

चित्रा वाघ यांच्यामुळे माझ्यावर हल्ला होऊ शकतो; उर्फी जावेदची महिला आयोगाकडे तक्रार

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -