बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. मागील महिन्याभरापासून हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटातील गाणी आणि ट्रेलर पाहून शाहरुखचे अनेक चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला परदेशात सुरुवात झाली होती. परदेशातील अनेक प्रेक्षक चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला उत्तम प्रतिसाद देत आहेत. शिवाय भारतामध्ये देखील प्रेक्षक अॅडव्हान्स बुकिंगला उत्तम प्रतिसाद देत आहेत.
‘पठाण’ने प्रदर्शनापूर्वीच कमावले 20 कोटी
‘PATHAAN’ REVIVES SINGLE SCREENS… #Pathaan is all set to revive theatrical biz, going by the terrific advance bookings… Most importantly, as many as 25 single screens across #India – which were shut – will re-open with #Pathaan this week, given the unprecedented buzz. pic.twitter.com/ICGpywDTzh
— taran adarsh (@taran_adarsh) January 23, 2023
समोर आलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत ‘पठाण’ चित्रपटाच्या एक मिलियनपेक्षा जास्त तिकिटांची विक्री झाली आहे. अॅक्शन आणि रोमांसने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत.
बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये अॅडव्हान्स बुकिंगला उत्तम प्रतिसाद
#Pathaan *advance booking* status at *national chains*… Update till Sunday, 5.15 pm…
⭐️ #PVR: 1,30,000
⭐️ #INOX: 1,13,000
⭐️ #Cinepolis: 57,500
⭐️ Total tickets sold: 3,00,500
NOTE: Data of *opening day* [25 Jan 2023] ONLY. pic.twitter.com/FtsvpFEtub— taran adarsh (@taran_adarsh) January 22, 2023
भारतातील अनेक राज्यांमध्ये चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला जात आहे. परंतु बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये अॅडव्हान्स बुकिंग जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. तसेच पंजाब आणि गुजरातमध्ये चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे.
शाहरुखचं 4 वर्षानंतर पदार्पण
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.
हेही वाचा :