‘शमशेरा’च्या ॲडव्हान्स बुकिंगने केला १२ कोटींचा टप्पा पार

शमशेरा चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग चालू झालं असून पहिल्या दिवशी शमशेरा चित्रपट १२ कोटीची कमाई करू शकतो.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘शमशेरा’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. रणबीर कपूर जवळपास ५ वर्षानंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाआधी रणबीर कपूर संजू चित्रपटामध्ये दिसला होता. जो खूप ब्लॉकबस्टर सिद्ध झाला होता. यावेळी सुद्धा रणबीर कपूरचा शमशेरा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करेल असं दिसून येत आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, रणबीर कपूरचा शमशेरा पहिल्या दिवशी चांगली कमाई करेल. यावेळी शमशेरा चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग चालू झालं असून पहिल्या दिवशी शमशेरा चित्रपट १२ कोटीची कमाई करू शकतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_)

 ट्रेड रिपोर्ट्सनुसार, शमशेरा चित्रपटाला अॅडव्हान्स बुकिंग चांगली मिळत आहे. मात्र, चित्रपटाच्या तिकिटाची किंमत वाढवण्यात आली नाही. अॅडव्हान्स बुकिंगनुसार पहिल्या दिवशी या चित्रपटाची १२ कोटी पेक्षा जास्त कमाई होऊ शकते.

चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग पाहता प्रोडक्शन हाऊस लगेच तिकिटाची किंमत वाढवते. मात्र, यावेळी शमशेरा चित्रपटाची तिकिट वाढवलेली नाही. प्रोडक्शन हाऊसच्या या निर्णयामुळे नक्कीच चित्रपटाला फायदा होऊ शकतो.करण मल्होत्रांच्या दिग्दर्शनात बनलेला शमशेरा चित्रपटात रणबीर कपूर व्यतिरिक्त वाणी कपूर आणि संजय दत्त सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतंच निर्मात्यांनी चित्रपटाचं ‘काले नैना’ गाणं रिलीज केलं आहे.


हेही वाचा :प्रेग्नेंट आलियाचे ‘डार्लिंग’च्या प्रमोशन दरम्यानचे फोटो होतायत व्हायरल