Bollywood सोडल्यानंतर जायरा वसीमने २ वर्षांनी शेअर केला फोटो, बघा आता कशी दिसते

जायराच्या फोटोवर तिच्या चाहत्यांनी प्रेमाचा पाऊस पाडला आहे

After 2 years leaving Bollywood actress zaira Wasim shares her photo
Bollywood सोडल्यानंतर जायरा वसीमने २ वर्षांनी शेअर केला फोटो, बघा आता कशी दिसते

नॅशनल अवॉर्ड विजेती अभिनेत्री जायरा वसीम (Zaira Waseem) हिने २ वर्षांपूर्व बॉलिवूडची झगमगती दुनिया सोडण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. जायरा सोशल मीडियावर फार सक्रीय असायची मात्र बॉलिवूड सोडल्यानंतर तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करणे देखील बंद केले होते. आता तब्बल २ वर्षांनी जायरा वसीम हिने तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी ती बॉलिवूडमध्ये परत येत असल्याच्या चर्चा सुरू केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zaira Wasim (@zairawasim_)

जायराने बॉलिवूड सोडल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करणे बंद केले होते. ती केवळ धार्मिक आणि आयुष्यावर आधारीत काही कोट्स शेअर करत होती. त्याचप्रमाणे काही धार्मिक व्हिडिओ शेअर करुन ती लोकांना मोटिवेट करताना दिसत होती. मात्र तिने आता शेअर केलेला तिचा फोटो पाहून चाहत्यांना देखील आनंद झालाय. जायराने फोटो शेअर करताच काही वेळातच तो प्रचंड व्हायरल झाला आहे.

फोटोमध्ये जायराचा चेहरा दिसत नाहीये. तिने काळ्या रंगाचा बुरखा परिधान करुन ती तिरकी उभी असल्याने तिचा चेहरा दिसत नाहीये. मात्र तरीही देखील तिची एक झलक पाहून चाहत्यांनी फोटोवर लाईक्स कमेंटचा वर्षाव केलाय. ‘ऑक्टोबरची गर्मी देणारा सूर्य’, असे म्हणत जायराने तिचा फोटो शेअर केलाय. जायराच्या फोटोवर तिच्या चाहत्यांनी प्रेमाचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी कमेंट करत बॉलिवूडमध्ये परत कधी येणार असे प्रश्न विचारले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, जायराने नोव्हेंबर २०२० आपल्या सोशल मीडियावरुन तिने चाहत्यांना तिचे फोटो काढून टाकण्याची विनंती केली होती. तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात करत आहे असे तिने म्हटले होते. जायराने तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता. २०१९मध्ये जायराने फेसबुरवर भली मोठी पोस्ट लिहीत बॉलिवूडची रजा घेतली होती.


हेही वाचा – Cruise drug bust: आर्यनच्या अटकेनंतर मन्नतबाहेर किंग खानसाठी फॅन्सचे Take careचे पोस्टर