Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 22 वर्षानंतर ‘गदर 2’ मधून पुन्हा झळकणार अनोखी प्रेमकथा

22 वर्षानंतर ‘गदर 2’ मधून पुन्हा झळकणार अनोखी प्रेमकथा

Subscribe

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ चित्रपटाला त्या काळी प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास करोडोंची कमाई केली होती. अनिल शर्मा यांच्या या चित्रपटाचे यश पाहून यंदा या चित्रपटाचा दुसरा पार्ट ‘गदर 2’ देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेते सनी देओल आणि अमीषा पटेल मुख्य भूमिकेत असतील तसेच अभिनेता उत्कर्ष शर्मा त्यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री सिमरत कौर सनी देओलच्या सूनेच्या भूमिकेत दिसेल.

22 वर्षानंतर ‘गदर 2’ मधून झळकणार अनोखी प्रेमकथा

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

मागील अनेक महिन्यांपासून हा चित्रपट चर्चेत आहे. नुकतीच एक पोस्ट अभिनेता सनी देओलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिलंय की, “तेच प्रेम, तिच कथा, पण यावेळी भावना वेगळ्या असतील. ‘गदरः एक प्रेम कथा’ पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये परत येत आहे. ते पण 9 जून रोजी. हा चित्रपट 4k व्हिज्युअल आणि डॉल्बी अॅटमॉस आवाजात प्रदर्शित होणार आहे. तेही मर्यादित कालावधीसाठी. उद्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होत आहे.”

चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल

- Advertisement -

Sunny Deol On 20 Years Of Gadar: The Movie Helped Me Break Out Of Comfort Zone - Filmibeat

काही दिवसांपूर्वी ‘गदर 2’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून चित्रपट पोस्ट प्रॉडक्शनच्या टप्प्यावर आहे. या आधी हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात होतं मात्र, आता हा 9 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, हा चित्रपट तयार करण्यासाठी जवळपास 100 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तर अभिनेता सनी देओलने चित्रपटासाठी 5 कोटी चार्ज केले आहेत. अमिषा पटेलने 2 कोटी चार्ज केले आहेत.


- Advertisement -

हेही वाचा :

राघव चड्ढासोबत एंगेजमेंट करण्यापूर्वी परिणीतीने केला होता मजेशीर करार

- Advertisment -