क्या बात हैं! 83नंतर रणवीरला ५ बायोपिक्सची ऑफर

रणवीर सिंहला ८३ सिनेमानंतर ५ बायोपिक सिनेमांची ऑफर आल्याचे सांगण्यात येत आहे. यातील तीन सिनेमे हे क्रिकेटवर आधारित आहेत. ए

After 83 Ranveer singh was offered 5 biopics
क्या बात हैं! 83नंतर रणवीरला ५ बायोपिक्सची ऑफर

८३ या सिनेमाची सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. रणवीरच्या तगड्या अभिनयाने ८३ सिनेमाने चार चाँद लावले आहे. रणवीरने ८३ सिनेमात क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका उत्तमरित्या साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. सिनेमातील रणवीर सिंहचा लुक,अभिनय आणि त्याचे खेळाप्रती असलेले प्रेम रणवीरने सिनेमातून दाखवून दिले. प्रेक्षकच नाही तर बॉलिवूड सेलिब्रेटींही रणवीरचे कौतुक केले आहे. सध्या रणवीर हा बॉलिवूडचा टॉप अभिनेता म्हणून चर्चेत आहे. ८३मधल्या तगड्या भूमिकेनंतर रणवीरला अनेक बायोपिक सिनेमांची ऑफर येत आहे.

रणवीर सिंहला ८३ सिनेमानंतर ५ बायोपिक सिनेमांची ऑफर आल्याचे सांगण्यात येत आहे. यातील तीन सिनेमे हे क्रिकेटवर आधारित आहेत. एका मुलाखतीत रणवीरने ही माहिती दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार रणवीर येत्या काळात एका पॅराप्लेजिक स्विमरच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. हा सिनेमा स्विमिंगवर आधारित असणार आहे. या सिनेमाविषयी प्रतिक्रिया देताना रणवीरने म्हटले होते की, मला वाटते सिनेमासाठी प्रेक्षकांना आणखी वाट पहावी लागणार आहे. पाच बायोपिक डेव्हलपमेंटच्या वेगवेगळ्या स्टेजवर आहेत. यातील एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि लवकरच सिनेमाची घोषणा केली जाणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

रणवीर कपूर येत्या काळात रॉकी रानी की प्रेम कहानी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात रणवीर आणि आलिया यांची मुख्य भूमिका असणार आहे. तसेच रणवीर रोहित शेट्टीच्या सर्कस आणि जयेशभाई जोरदार या सिनेमातही दिसणार आहे.


हेही वाचा –  Year Ender 2021: सूर्यवंशी ते अंतिम, ‘या’ सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर केली तगडी कमाई