आमीर खाननंतर सलमानचा देखील ‘हर घर तिरंगा’मध्ये सहभाग

नुकताच बॉलिवूड अभिनेता आमीर खानने त्याच्या घराबाहेर तिरंगा लावला आहे. शिवाय अभिनेता सलमान खानने देखील त्याच्या घराबाहेर तिरंगा फडकवला आहे. या दोघांच्या घराबाहेरील तिरंग्याचे फोटो समोर आले आहेत.

आपण सर्वजण भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण कोणतेच सण साजरे केले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय सण देखील निर्बंधातच पार पाडले. मात्र, यावर्षी कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. तसेच, भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा स्वातंत्र्योत्सवाचा जल्लोष अधिक आहे. दरम्यान, भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत घराघरांत भारताचा झेंडा लावला जात आहे. देशभरात 13 ऑगस्ट शनिवारपासून या मोहिमेला सुरूवात झाली आहे. सामान्य लोकांसोबतच आता बॉलिवूड कलाकारही या मोहिमेमध्ये सहभागी झाले असल्याचं दिसून येत आहे.

नुकताच बॉलिवूड अभिनेता आमीर खानने त्याच्या घराबाहेर तिरंगा लावला आहे. शिवाय अभिनेता सलमान खानने देखील त्याच्या घराबाहेर तिरंगा फडकवला आहे.

या दोघांच्या घराबाहेरील तिरंग्याचे फोटो समोर आले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो खूप व्हायरल होऊ लागले आहेत. शिवाय यामुळे या दोघांचं कौतुकही केलं जात आहे.

‘लाल सिंह चड्ढा’ला प्रेक्षकांची नापसंती
आमीर खानच्या लाल सिंह चड्ढा चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळालेली नाही. आमीर खानला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होती. परंतु या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. सलमान खान सध्या त्याच्या टायगर ३ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत कतरिना कैफ सुद्धा दिसून येणार आहे.


हेही वाचा :राकेश झुनझुनवाला यांचं बॉलिवूडमधील ‘या’ 3 चित्रपटांशी कनेक्शन