70 च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर आजही मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी 2022 मध्ये, अभिनेता वरुण आणि कियारा यांच्या ‘जुग जुग जिओ’ चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. नीतू कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. दरम्यान, नुकतंच त्यांनी मुंबईत नवीन घर विकत घेतल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नीतू कपूर यांनी 4BHK चा मोठा फ्लॅट विकत घेतला आहे.
नीतू कपूरने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 4BHK फ्लॅट खरेदी केला आहे. यासाठी त्यांनी 1.04 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे, जी 10 मे 2023 रोजी नोंदणीकृत झाली होती. त्यांनी 19 फ्लोअर्स सनटेक रिअल्टीने अल्ट्रा-लक्झरी प्रोजेक्ट सिग्निया आइलच्या 17 व्या मजल्यावर फ्लॅट विकत घेतला आहे. त्यांचे हे घर जवळपास 3,387 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. या आलिशान अपार्टमेंटमध्ये तीन पार्किंग एरिया देखील आहेत. तर या अपार्टमेंटची किंमत 17.4 कोटी रुपये आहे.
View this post on Instagram
सध्या नीतू कपूर वांद्रे येथील कृष्णराज बंगल्यात राहते. तर रणबीर कपूर आणि आलिया पाली हिल्स येथीर घरात राहतात.
आलियानेही खरेदी केलं स्वतःचं नवं घर
नीतू कपूर यांच्याआधी आलियाने देखील वांद्रे येथे 37 कोटींची फ्लॅट खरेदी केला आहे. शिवाय त्याआधी आलियाने तिची बहीण शाहीन भट्टला 7.68 कोटीचे दोन फ्लॅट गिफ्ट केले आहेत. जे जुहू येथे आहेत.
हेही वाचा :