Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन अमिताभनंतर अनुष्का शर्मानेही केली बाईक राइड; पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अमिताभनंतर अनुष्का शर्मानेही केली बाईक राइड; पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Subscribe

नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मुंबईच्या ट्रॉफिकमुळे एका चाहत्याच्या बाईकवरुन शूटसाठी पोहोचले होते. ही बातमी त्यांनी स्वतः सोशल मीडियावरुन शेअर केली होती. अशातच अमिताभ नंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील आपल्या बॉडीगार्डसोबत बाईक राइड केली. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

अनुष्का शर्माची बाईक राइड

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत असते. कधी-कधी अनुष्का शर्माचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होतो. . दरम्यान, अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा तिच्या बॉडीगार्डसोबत बाईक राइड करताना दिसत आहे. यावेळी अनुष्का शर्मा एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसली. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्माने चष्मा घातलेला असून तिने शर्ट-पँट घातलेली दिसत आहे. अनुष्का शर्माचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

अनुष्काच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

- Advertisement -

अनुष्का शर्माचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. यात काहींनी तिला ट्रोल देखील केलं आहे. एकाने लिहिलंय की, ना मॅडमने हेलमेट घालतेय, ना तिच्या बॉडीगार्डने. तसेच काहींनी अनुष्काच्या कपड्यांवरही अनेक कमेंट्स केल्या आहेत.


हेही वाचा :

मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या Big b च्या मदतीला आला बाईकस्वार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -