अमिताभ यांच्यानंतर रजनीकांत यांनी देखील जारी केले पर्सनॅलिटी राइट्स

तमिळ सुपरस्टार अभिनेते रजनीकांत आपल्या हटके स्टाईलमुळे ओळखले जातात. रजनीकांत चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. त्यांचे जगभरात चाहते आहेत. परंतु अनेकदा काहीजण त्यांच्या फोटो आणि आवाजाचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात. अनेक ब्राँड देखील जाहिरातींमध्ये त्यांची परवानगी न घेता फोटो आणि आवाजाचा वापर करतात. त्यामुळे या गोष्टींवर आळा घालण्यासाठी रजनीकांत यांनी नुकतीच एक सार्वजनिकरित्या नोटीस जारी केली आहे. या नोटीसच्या माध्यमातून रजनीकांतने सुचित केलंय की, त्यांचे फोटो आणि आवाजाचा वापर त्यांची परवागणी घेतल्याशिवाय केला जाणार नाही.

रजनीकांत यांनी त्यांचा आवाज आणि फोटोंच्या माध्यमातून व्यावसायिक स्तरावर शोषण करणाऱ्यांविरोधात हा निर्णय घेतला आहे. रजनीकांत यांचे वकील एस एलमभारती यांनी ही सार्वजनिक नोटीस जारी केली आहे. ज्यात रजनीकांत यांची आयडेंटिटी, पब्लिसिटी आणि सेलिब्रिटी राइट्सचे जर कोणी परवागणी शिवाय उल्लंघन केले कर त्या व्यक्ती किंवा ब्राँडविरोधात कडक कारवाई केली जाईल. शिवाय रजनीकांत यांच्याकडे त्यांची आयडेंटिटी, नाव, आवाज, फोटोसोबतच इतर अनेक गोष्टी वापरण्यावर नियंत्रण आहे. जे सहज ओळखले जाऊ शकते.

अमिताभ बच्चन यांनी देखील मिळवलं होतं पर्सनॅलिटी राइट्स
रजनीकांत यांच्या आधी महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील याचं निर्णय घेतला होता. त्यांनी दिल्ली हायकोर्टामध्ये जाऊन पर्सनॅलिटी राइट्सच्या माध्यामातून आपला आवाज आणि फोटो वापरण्याविरोधात पाऊल उचलण्यासाठी अधिकार मिळवला होता. आता त्यांच्यानंतर रजनीकांत यांनी देखील हाच निर्णय घेतला आहे.


हेही वाचा :

किती सुंदर..! प्रियंका चोप्राच्या मुलीला पाहताच चाहत्यांच्या प्रतिक्रिया