Cruise drug bust: आर्यनच्या अटकेनंतर मन्नतबाहेर किंग खानसाठी फॅन्सचे Take careचे पोस्टर

सपोर्ट करण्यासाठी आलेल्या किंग खानच्या फॅन्सचे त्याने मनापासून आभार मानले मात्र सुरक्षेच्या कारणामुळे फॅन्सनी माझ्या घराबाहेर गर्दी करू नका असे आवाहन शाहरुखने केले आहे

अभिनेता शाहरुख खानचा (shahrukh khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणा एनसीबीने अटक केल्यानंतर शाहरुखच्या डोक्याचा ताप वाढला आहे. मुलाच्या अटकेमुळे शाहरुख चांगलाच चर्चेत आलाय. शाहरुख सध्या वाईट काळातून जात असल्याने नेहमीप्रमाणे त्याचे फॅन्स त्याला धीर देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी शाहरुखला सपोर्ट केला आहे. आर्यनच्या अटकेनंतर शाहरुखच्या फॅन्सनी त्याच्या घराबाहेर म्हणजेच मन्नत बंगल्याच्या बाहेर ‘टेक केअर किंग’ (Take Care King) असे पोस्टर लावले आहेत. शाहरुखला सपोर्ट करण्यासाठी त्याच्या फॅन्सनी मन्नतच्या बाहेर मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले.

सोशल मीडियावर टेक केअर किंगच्या पोस्टरचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. ‘जगातील कोण कोणते फॅन्स तुझ्यावर प्रेम करतात शाहरुख. तुझ्या वाईट वेळेत आम्ही तुझ्या सोबत आहे. टेक केअर किंग’,असे पोस्टरवर लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team SRK Nepal (@teamsrknepal)

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी शाहरुखला सपोर्ट केला आहे. शाहरुख स्पेनहून मुंबईत येताच भाईजान सलमान खान त्याला मन्नतवर भेटण्यासाठी गेला होता. त्याचप्रमाणे अभिनेता सुनील शेट्टी, सुचित्रा कृष्णमूर्ती,विवेक वासवानी, सिकंदर खेर, महीप कपूर आणि हंसल मेहता यासारख्या अनेक कलाकारांनी शाहरुखला सपोर्ट केला आहे.

मन्नतच्या बाहेर पोस्टर घेऊन सपोर्ट करण्यासाठी आलेल्या किंग खानच्या फॅन्सचे त्याने मनापासून आभार मानले मात्र सुरक्षेच्या कारणामुळे फॅन्सनी माझ्या घराबाहेर गर्दी करू नका असे आवाहन शाहरुखने त्याच्या फॅन्सना केले आहे. आर्यन खानला अटक केल्यानंतर अद्याप शाहरुखकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आर्यन खान सध्या एनसीबीच्या कोठडीत असून ७ ऑक्टोबरपर्यंत त्याची कोठडी वाढवण्यात आली आहे.


हेही वाचा – Mumbai cruise drug bust case: ड्रग्जच्या सौदेबाजीसाठी कोड वर्डचा वापर, आर्यनच्या मोबाईलमध्ये धक्कादायक माहिती