घरमनोरंजनच्युइंगगम टॉपनंतर उर्फीचा नवा कहर; हा लूक पाहून चाहत्यांना आलं हसू

च्युइंगगम टॉपनंतर उर्फीचा नवा कहर; हा लूक पाहून चाहत्यांना आलं हसू

Subscribe

आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अनोख्या स्टाईलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकजण तिच्या हटके स्टाईलचं कौतुक करतात तर काहीजण तिला प्रचंड ट्रोल देखील करत असतात. मात्र, उर्फी कोणालाही न घाबरता आपली फॅशन आणि कपडे यांच्यात कोणताच बदल करत नाही. दरम्यान, आता अशातच उर्फी आणखी एक आगळा-वेगळा लूक शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नुकताच उर्फी एक नवा लूक शेअर केला ज्यात तिने ब्लॅक कलरची फुल पॅन्ट आणि वर ड्रेससोबतच काळ्या रंगाची ढालही लावली आहे. या लूकबद्दल माहिती मिळाल्यावर उर्फीने सांगितले की ती तिच्या संरक्षणासाठी आहे.

- Advertisement -

उर्फीच्या या ड्रेसवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. ज्यात एका यूजरने लिहिलंय की, ‘पोलिसांसाठी ही चांगली कल्पना आहे. हे परिधान केल्याने पोलिसांच्या कामगिरीदरम्यान हात मोकळे होतील. दुसऱ्याने लिहिले, ‘अरे, हे लाठीचार्ज वाली संरक्षण आहे. त्याचवेळी, एकाने सलमान खानचा उल्लेख केला आणि लिहिले- सलमानने सुरक्षिततेसाठी बुलेट प्रूफ ग्लासने बनवलेला हा ड्रेस आणावा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

दरम्यान, काल देखील उर्फी अशाच प्रकारचा एक अतरंगी लूक केला होता ज्यात तिने चक्क च्युइंगगम चा टॉप परिधान केला होता. या लूकमधील फोटो शेअर करत खाली कॅप्शनमध्ये उर्फीने लिहिलंय की, “द बबलगम टॉप, मेड फ्रॉम च्युइंगगम” हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी उर्फीची प्रचंड खिल्ली उडवली.

- Advertisement -

हेही वाचा :

उर्फीने घातला चक्क च्युंइगमचा टॉप; ट्रोलर्सने उडवली खिल्ली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -