Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'Cirkus' चित्रपटानंतर रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी नव्या चित्रपटासाठी पुन्हा एकत्र

‘Cirkus’ चित्रपटानंतर रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी नव्या चित्रपटासाठी पुन्हा एकत्र

Subscribe

बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंग आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी एकमेकांसोबत पहिल्यांदा ‘सिंबा’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात रणवीर सिंहने एका पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 200 करोडची कमाई केली होती. ‘सिंबा’ नंतर पुन्हा एकदा रोहित आणि रणवीर ‘सर्कस’ ह्या विनोदी चित्रपटासाठी एकत्र आले. येत्या काळात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सूत्रांच्या मते, रणवीर सिंह आणि रोहित शेट्टीने तिसऱ्या चित्रपटासाठी हात मिळवणी केली आहे.

रणवीर सिंहने नुकताच एक व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो रोहित शेट्टीसोबत कमर्शियल पार्टनरशिपची घोषणा करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर अॅक्शन मॅनच्या रूपात दिसत असून रोहित शेट्टी रणवीरला गाइड करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

- Advertisement -

व्हिडिओमध्ये रणवीर सिंह बंदूक चालवताना दिसत आहे आणि रोहित शेट्टी रणवीरला मार्गदर्शन करत “आरामात कर” असं म्हणत आहे. पुढे या व्हिडिओमध्ये अनेक अॅक्शन स्टंड दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत रणवीर ने खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “बॉस आणि बाबा पुन्हा एकत्र आले आहेत.”

- Advertisement -

जयेशभाई जोरदार’ला प्रेक्षकांची नापसंती
रणवीर सिंहचा नुकताच ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपट रिलीज झाला असून चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. याशिवाय रणवीर येत्या काळात करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, धर्मेंद्र, शबाना आजमी आणि जया बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

 


हेही वाचा :‘केजीएफ 3’ मध्ये होणार ऋतिक रोशनची एन्ट्री? केजीएफच्या दिग्दर्शकांचा खुलासा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -