कोरोनालाही करिना आवरेना, रिपोर्ट निगेटीव्ह येताच बेबोच्या पार्ट्या सुरू

करिनाची बहिण करिश्मा कपूरने तिच्या घरी शानदार पार्टी आयोजित केली होती

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर नुकतीच कोरोना कोरोनामुक्त झाली असून तिच्या पार्ट्याही सुरू झाल्याचे फोटो समोर आले आहेत. कोरोनातून मुक्त झाल्यानंतरही काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र करिनाने डॉक्टरांचा सल्ला न मानता पुन्हा एकदा पार्ट्या झोडण्यास सुरुवात केली आहे. करिनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये ‘आम्ही परत आलोय’ असं म्हणत तिची बेस्ट फ्रेंड अमृता अरोरासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यात दोघीही ग्लमरस अंदाजात दिसत आहे. दोघी पार्टीच्या मूडमध्ये असल्याचे या फोटोतून कळत आहे. नुकतीच करिनाच्या गर्ल्स गॅगची धमाकेदार पार्टी सेलिब्रेट झाली आहे. ज्यात करिना आणि तिच्या गर्ल्स गॅगने धम्माल केली. कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर करिना काही पार्ट्यांना हजेरी लावण्यात कोणतीही कसर सोडत नाहीये त्यामुळे कोरोनालाही करिना आवरेनाशी झालीय असेच म्हणावे लागेल.

मिळालेल्या माहितीनुसार, करिनाची बहिण करिश्मा कपूरने तिच्या घरी शानदार पार्टी आयोजित केली होती. करिना कोरोनातून बरी झाली याचे सेलिब्रेशन करण्यासाठी ही पार्टी होती. करिश्माच्या पार्टीत करिना,अमृतासोबत सैफ अली खान, तैमूर, जेह,मलायका आरोरा, अर्जुन कपूर हे कलाकारही उपस्थित होते.

 

करिना कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला घरीच क्वारंटाइन करण्यात आले. १४ दिवस करिना तिच्या दोन्ही मुलांपासून दूर असल्याने मला मुलांची आठवण येत असल्याचे सांगत करिनाने एक भावूक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर करिना कोरोनामुक्त झाल्यानंतर मला सर्वात आधी माझ्या बाळांना भेटायचे आहे असे म्हटले होते. करिना क्वारंटाइन असताना तैमूर आणि जेहचा करिश्माने सांभाळ केला होता.

कभी खुशी कभी गम या सिनेमाला २० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने निर्माता करण जोहरने डिनर पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत करिना आणि अमृता यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर सीमा खान आणि महीप कपूर तसेच शनाया कपूर यांनाही कोरोनाची लागण झाली.


हेही वाचा –