कॉमेडियन कपिल शर्माने नुकताच त्यांच्या ‘मेगा ब्लॉकबस्टर’ ची घोषणी केली ज्यामध्ये रश्मिका मंदाना, कार्थी, तृष्णा कृष्णन आणि क्रिकेटर रोहित शर्मा दिसून येणार आहेत. दरम्यान, आता मिळालेल्या माहितीनुसार या मेगा ब्लॉकबस्टरमध्ये दीपिका पादुकोणची सुद्धा एन्ट्री झाली आहे.
View this post on Instagram
दीपिका पादुकोण ने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा ‘मेगा ब्लॉकबस्टर’मधील लूक शेअर करत खाली कॅप्शनमध्ये ‘सरप्राईज’ असं लिहिलं आहे. दीपिका आधी कपिल शर्माने त्याचा लूक शेअर केला होता.
View this post on Instagram
तसेच त्यानंतर रश्मिका मंदाना, तृषा कृष्णन, रोहित शर्मा, सौरव गांगुली आणि कार्थी यांनी देखील ‘मेगा ब्लॉकबस्टर’मधील आपला लूक शेअर केला.
View this post on Instagram
परंतु नक्की हे समोर आलं नाही की ‘मेगा ब्लॉकबस्टर’ चित्रपट असणार आहे की प्रमोशन करण्याची नवी पद्धत. कपिल शर्माने ‘मेगा ब्लॉकबस्टर’ चा पोस्टर शेअर करत लिहिल होत की, ‘हे माझ्या चाहत्यांसाठी…आशा आहे तुम्हाला आवडेल’.
View this post on Instagram
दरम्यान, आता या सर्व दिग्गज कलाकारांनी, क्रिकर्टसना ‘मेगा ब्लॉकबस्टर’ मध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.