‘ब्रह्मास्त्र’मध्ये फक्त दीपिका-रणवीरनंतर अमीर खानची सुद्धा होणार एन्ट्री

मागील काही दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. तसेच, चित्रपटाची वाढती कमाई पाहून चित्रपटावर टिका करणाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

नुकताच प्रदर्शित झालेला बॉलिवूडमधील भव्य चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ने बॉक्स ऑफिसवर कमाल करायला सुरूवात केली आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या सुरूवातीलाच जबरदस्त रेकॉर्ड करायला सुरूवात केली आहे. अशातच आता चित्रपटाबाबत प्रेक्षकांनी आपलं मतं बदलेलं आहे. मागील काही दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. तसेच, चित्रपटाची वाढती कमाई पाहून चित्रपटावर टिका करणाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, चित्रपटाचं यश पाहता या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारही खुश आहेत. सध्या त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

चित्रपट निर्माता करण जौहरने हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रणबीर कपूर, रणवीर सिंह, अमीर खान, शाहरूख खान, आलिया भट्ट , दीपिका पादुकोण आणि करण जौहर दिसत आहेत. खरंतर हा फोटो 2018 मधील असून हे सर्व कलाकार त्यावेळी करण जौहरच्या घरी पार्टी करण्यासाठी पोहोचले होते. शिवाय या फोटोखाली त्याने कॅप्शनमध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर असं लिहिलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

हा फोटो पाहून प्रेक्षक अधिकच उत्सुक झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात रणवीर आणि दीपिका, अमीर सुद्धा दिसणार आहेत. खरंतर ब्रह्मास्त्रच्या पहिल्या भागात देवाच्या चरित्र आणि शिवाच्या आई-वडीलांबाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही. या सर्व गोष्टींचा उलगडा दुसऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. यामध्ये शिवच्या आई-वडीलांबाबत रहस्य समोर येणार आहे. कदाचित ही भूमिका रणवीर आणि दीपिका साकारणार आहेत.


हेही वाचा : 

कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’मध्ये हा अभिनेता साकारणार संजय गांधींची भूमिका