Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन बॉलिवूडमध्ये कमबॅक केल्यानंतर ईशाने केलं निर्मिती क्षेत्रात पदार्पण

बॉलिवूडमध्ये कमबॅक केल्यानंतर ईशाने केलं निर्मिती क्षेत्रात पदार्पण

ईशाने सोशल मीडिया अकांउटवर एका नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे ईशा देओल(Esha Deol) गेल्या एक दशकापासून रुपेरी पडद्यापासून दूर होती. पण ईशा आता बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल हिने 2002 साली ‘कोई मेरे दिलसे पुछे’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. ईशाने अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे. तसेच ईशाने ‘धूम’ (Dhoom) सारख्या सुपरहिट चित्रपटात महत्वपुर्ण भूमिका साकारली होती. पण विवाहानंतर ईशा कोणत्याही सिनेमात झळकली नाही. नुकतच ईशाने सोशल मीडिया अकांउटवर एका नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. इतकचं नाही तर हा सिनेमा ईशा स्वत: प्रोड्यूस करणार असल्याचे तिने सांगितले आहे. ईशाने तिच्या प्रोडक्शन हाउसचे नाव Bharat Esha Films (BEF) असे ठेवले आहे. याच बॅनर अंतर्गत ईशा तिचा पहिला सिनेमा निर्मित करणार आहे. तसेच या सिनेमात ती अभिनय सुद्धा करणार असल्याचे सांगितले आहे. या प्रोडक्शन हाउसमध्ये ईशा आणि तिचा पति दोघेही भागीदार असणार आहे. तसेच ईशाचा आगामी सिनेमा राम कमल मुखर्जी दिग्दर्शित करणार आहे.(After her comeback in Bollywood, Esha Deol takes on the role of producer)

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Deol Takhtani (@imeshadeol)

- Advertisement -

काही दिवसांपुर्वी ईशा ओटीटी प्लॅटफॉमच्या माध्यमातून धमाकेदार एंन्ट्री करणार असल्याची घोषणा केली होती. अजय देवगणची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘रुद्र : द एज ऑफ डार्कनेस’ (Rudra : The Edge Of Darkness) या सीरिजमध्ये ती दिसणार आहे. जवळपास एका दशकानंतर अभिनेत्री ईशा देओल आणि अजय देवगण (Ajay Devgn) एकत्र झळकणार आहेत. ईशा देओल 2015 साली एका साऊथ चित्रपटात दिसली होती. त्यानंतर एका शॉर्ट फिल्म मध्ये. ईशा पुन्हा एकदा सिनेमात काम करण्यासाठी सज्ज होत असल्याने ईशाच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.हे हि वाचा – काळ्या रंगावरुन महिलेने केला होता अपमान, सोनाली कुलकर्णीने केला खुलासा- Advertisement -

 

- Advertisement -