घरमनोरंजनसलमानने दिली रानू मंडलला ५५ लाखांची अनोखी भेट!

सलमानने दिली रानू मंडलला ५५ लाखांची अनोखी भेट!

Subscribe

रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणे गातानाचा त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आणि त्यांना देशभरात मिळाली एक नवीन ओळख

रल्वे स्थानकावरील फलाटावर गायिका लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर सुप्रसिद्ध झालेली रानू मंडलला बॉलिवूड विश्वात खूपच पसंती मिळत आहे. पहिले रानूने गायक हिमेश रेशमियासोबच एक गाणं रेकॉर्ड केले. यानंतर सलमान खानने रानू मंडलला ५५ लाखांचे घर भेट स्वरूपात दिले आहे. यासोबत दबंग ३ चित्रपटात गाणं गाण्याचा कॉन्ट्रेक्ट देखील दिला आहे. परंतु या बातम्या पुर्णतः चुकीच्या असल्याचे सांगण्यात येत आहे.


हेही वाचा – ‘या’ व्यक्तीमुळे स्टेशनवर गाणारी रानू मंडाल बनली बॉलिवूड गायिका

कोलकातामधील एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणे गातानाचा त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आणि त्यांना देशभरात एक नवीन ओळख मिळाली. काही नसताना त्‍यांच्‍या सुरेल आवाजाने त्‍यांचे नशीब पलटले. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

या चर्चांना येतंय उधाण

रानू तिच्या सुरेल आवाजामुळे सिंगिंग रिॲरिटी शो ‘सुपरस्टार सिंगर’ या कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी हिमेश रेशमिया आणि सलमान खान उपस्थित होते. रानूचा मधूर आवाज ऐकून सलमान खान थक्क झाला. त्यानंतर तिने सलमानने रानूला घर भेट स्वरूपात दिले आहे. मात्र, सलमानकडून अधिकृत असे काही सांगण्यात आलेले नाही.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानही रानू मंडलच्या मदतीला पुढे आला आहे. सलमान खानने रानू मंडलला एक अलिशान घर दिले आहे. त्या घराची किंमत ५५ लाख इतकी आहे. इतकेच नव्हे तर आगमी चित्रपट दबंग ३ मध्ये गाणे गाण्याची संधी देखील देण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे, अशा चर्चांना उधाण आले असून अशा अफवा पसरवण्यात येत आहे.

- Advertisement -

‘या’ व्यक्तीमुळे रानू बनली रातोरात स्टार

रस्त्यावर गात असतानाचा तिचा व्हिडिओ एका व्यक्तिने सोशल मीडियावर टाकला. तो व्हायरल झाला आणि रानूच्या नशीबाला एक प्रकारे कलाटणीच मिळाली. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करणा-या त्या व्यक्तीला रानू कधीच विसरू शकणार नाही. तिच्या आयुष्यात ‘देवदूत’ बनून आलेली ही व्यक्ती नेमकी कोण? यावंर अनेक चर्चा सुरू असून तसे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात होते.

मात्र या गोष्टीचा अखेर उलगडा झाला आहे. या व्यक्तीचे नाव आहे, एतींद्र चक्रवर्ती. याव्य़क्तीने रानूचा व्हिडिओ आपल्या फेसबूकवर शेअर केला. त्याला चांगलीच पसंती मिळत हा व्हिडिओ बऱ्याच लोकांनी व्हायरल केल्याने आज रानू हिमेश रेशमियासह एक नवं गाणं रेकॉर्ड केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -