‘Jawan’ नंतर शाहरूख खान करणार ‘Don 3’ चित्रपटाची तयारी

2023 मध्ये शाहरूख खानचे 'जवान', 'पठाण' आणि 'डंकी' हे चित्रपट रिलीज होणार आहेत. याचदरम्यान शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाचे नुकतेच टीझर रिलीज झाले होते. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जवानचा टीझर पाहिल्यापासून शाहरूख खानचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत. 2023 मध्ये शाहरूख खानचे ‘जवान’, ‘पठाण’ आणि ‘डंकी’ हे चित्रपट रिलीज होणार आहेत. याचदरम्यान शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

रितेश सिधवानीने शेअर केला फरहान अख्तरचा फोटो शेअर

खरंतर, निर्माते शाहरूख खानच्या सुपरहिट ‘डॉन’ चित्रपटाचा तिसरा पार्ट घेऊन यायच्या तयारीत आहेत. रितेश सिधवानीने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये फरहान अख्तर लॅपटॉपवर काम करताना दिसून येत आहे. त्यासोबतच खाली कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे की, “100 टक्के फोकस जेव्हा ते काहीतरी लिहितात. खूप दिवसानंतर ते काहीतरी लिहित आहेत. सांगा ते काय करत आहेत?”

रितेश सिधवानीच्या या पोस्टवर चाहत्यांनी दिलं उत्तर…
रितेश सिधवानीच्या या पोस्टवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. चाहत्यांच्या मते फरहान अख्तर ‘डॉन 3’ चित्रपटाची स्क्रिप्ट लिहित आहे. चाहत्यांच्या मते, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरने शाहरूख खानच्या ‘डॉन 3’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे.

शाहरूखचे इतर आगामी चित्रपट
सध्या शाहरूख खान त्याच्या इतर आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून तो 2023 मध्ये शाहरूख खानचे ‘जवान’, ‘पठाण’ आणि ‘डंकी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तसेच शाहरूख खान ‘टाइगर 3’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘लाल सिंह चड्ढा’ आणि ‘रॉकेट्रीः द नांबी फॅक्ट्री’ यांसारख्या चित्रपटांमध्ये सुद्धा दिसणार आहे.

 


हेही वाचा :http://‘मेजर’ चित्रपटाची प्रेक्षकांना भुरळ; दोन दिवसातच केला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा पार