Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन कंगना आणि अनुष्कानंतर तापसी पन्नू झाली प्रॉड्यूसर

कंगना आणि अनुष्कानंतर तापसी पन्नू झाली प्रॉड्यूसर

तापसी पन्नूने अभिनया सोबतच निर्मीती क्षेत्रातही पदार्पण केलं आहे.

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu)तिच्या चित्रपटातून नेहमीच काही तरी हटके तसेच नावीन्यपुर्ण विषयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. तापसी बॉलिवूड इिंडस्ट्रीमधील अत्यंत उत्तम कलाकार असून गेल्या एक दशकापेक्षा जास्त  भारतीय सिनेमात तापसीने आपले योगदान दिले आहे. आता तापसी पन्नूने अभिनया सोबतच निर्मीती क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. तापसीने नुकतच एका प्रोडक्शन हाउसची घोषणा केली आहे. ‘आऊटसाइडरर्स फिल्म’ असे या प्रोडक्शन हाउसचे नाव ठेवण्यात आले असून, तापसीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हि गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या पोस्टवर कॅप्शनमध्ये तापसीने लिहलं की,” मी नव्या प्रवासासाठी सज्ज होत आहे तसेच माझ्या नवीन प्रोडक्शन हाउस ;आऊटसाइडर्स फिल्म; सोबत चित्रपटसृष्टीत आपलं योगदान देण्यासाठी खूप ऊत्साहीत आहे. यापुर्वी सुद्दा बिजनेस क्षेत्राशी जोडली गेल्यामुळे मॅनेजमेंट बद्दल मला माहिती आहे. मी नेहमीच निर्मीती क्षेत्रात येण्याचा विचार करत होती. 11 वर्षाच्या करीयर मध्ये प्रेक्षकांनी आणि इंडस्ट्रीने मला खुप प्रोत्साहन दिले आहे. आणि याच प्रेमाच्या आधारावर मी सशक्त आणि प्रतिभावान लोकांना पुढे येण्यास मदत करेन,प्रांजल आणि मी एकत्रीपणे  कॅमेराच्या पाठीमागच्या तसेच समोरील टॅलेंटड व्यक्तीना समोर आणण्यासाठी  तयार झालो आहोत.”(After Kangana and Anushka, Taapsee Pannu became the producer)

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

- Advertisement -

या प्रोडक्शन हाउस अंतर्गत पहिला प्रोजेक्ट एक थ्रिलर सिनेमा तयार करण्यात येणार आहे. तापसीकडे सध्या दोन कंपन्या आहेत ज्यामध्ये वेडींग प्लॅनिंग कंपनी आणि 7 एसेस पुणे नावाची एक बॅटमिंटंन टीमचा समावेश आहे. तसेच तापसीच्या वर्क फ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास तापसी लूट लपेटा,रश्मी रॉकेट,दोबारा, शाबास मीतू सिनेमात झळकणार आहे.हे हि वाचा – महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर मनसेने केली पोस्टरबाजी- Advertisement -

 

- Advertisement -