Shanaya kapoor covid positive: करिनानंतर शनाया कपूरही कोरोना पॉझिटिव्ह

शनाया सध्या क्वारंटाइन आहे

after kareena and maheep kapoor Shanaya kapoor tested covid positive
Shanaya kapoor covid positive: करिना अमृतानंतर अभिनेत्री शनाया कपूरही कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूडमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता आरोराला आधी कोरोनाची लागण झाली. त्यानंतर अभिनेत्री शनाया कपूरची आई महीप कपूर यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर शनाया आणि संजय कपूर यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. मात्र आता शनाया कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती स्वत: शनायाने दिली आहे. शनायाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत ही माहिती दिली. शनाया सध्या क्वारंटाइन आहे.

शनायाने तिच्या स्टोरीमध्ये म्हटले आहे, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. मला कोरोनाची हलकी लक्षणे जाणवत असल्याने मी स्वत:ला आयसोलेट केलेय. चार दिवसांआधी मी चाचणी केली तेव्हा माझे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते मात्र आता माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मी कोरोनाचे सगळे प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्या आणि सुरक्षित रहा.


करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये करिना कपूर आणि अमृता अरोरा कोरोना पॉझिटिव्ह आल्या. त्यानंतर संजय कपूर आणि सोहल खान यांच्या पत्नी महीप कपूर आणि सीमा खान यांना कोरोनाची लागण झाली. करिनाच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. तर मलायका अरोरा,करण जोहर आणि आलिया भट्ट यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.


हेही वाचा – Kareena kapoor: कोविडचे नियम सांभाळत करिना सैफची कॉफी डेट, पहा फोटो