घरताज्या घडामोडीकरिना अमृता नंतर महीप कपूर आणि सीमा खानही कोरोना पॉझिटिव्ह

करिना अमृता नंतर महीप कपूर आणि सीमा खानही कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

महिप कपूर यांना थंडी आणि तापासारखी लक्षणे

अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) आणि तिची मैत्रीण अमृता अरोरा (Amruta Arora) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर दोघीही घरीच क्वारंटाइन झाल्या आहेत. करिनानंतर आता अभिनेते संजय कपूर (Sanjay Kapoor)  यांच्या पत्नी महीप कपूर (Maheep Kapoor)  आणि अभिनेता सोहेल खानची (Sohail Khan)  पत्नी सीमा खान (seema Khan) यांची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, महिप कपूर यांना थंडी आणि तापासारखी लक्षणे दिसून आली त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. महीप यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. महीप कपूर आणि सीमा खान यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दोघींनी स्वत:ला होम क्वारंटाइन केले आहे.

सोमवारीच अभिनेत्री करिना कपूरने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी केली. करिनाने एक पोस्ट शेअर करत मी कोरोना पॉझिटिव्ह असून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी. माझी तब्येत आता ठिक असून माझ्या कुटुंबातील व्यक्ती आणि स्टाफमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढलेली नाही, असे करिनाने म्हटले आहे. मुंबई पालिकेने करिनाचे घर सील केले असून करिनाच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्याचे काम पालिका करत आहे.

- Advertisement -

कभी खुशी कभी गम या सिनेमाच्या २०व्या वर्षपूर्तीनिमित्त बॉलिवूडचे काही मोजके कलाकार एका छोट्या डिनर पार्टीला एकत्र आले होते. करिनासोबत तिची बहिण करिश्मा कपूर आणि जवळची मैत्रीण अमृता आरोरा आणि १०-१५ जण उपस्थित होते. पार्टीत एक व्यक्ती सतत खोकत होती असे करिनाच्या संबंधितील एका व्यक्ती सांगितले. तिथे करिना आणि अमृता यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – kareena Kapoor Corona Positive: ‘मी ठिक आहे’, कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -