‘Khatron ke khiladi 12’ नंतर शिवांगी जोशी करणार ‘Bigg boss 16’ मध्ये एन्ट्री

हिंदी टेलिव्हिजन वाहिनीवरील प्रसिद्ध अभिनेत्री शिवांगी जोशी आता लवकरच ‘खतरो के खिलाडी 12’ या रियालिटी शो मध्ये दिसणार आहे. शिवांगी जोशीने नुकतंच ‘खतरो के खिलाडी 12’ च्या प्रोमोचे शूट केले आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवांगीने दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये ‘खतरो के खिलाडी 12’ सोबतच ‘बिग बॉस 16’च्या एन्ट्रीबाबत आपलं मत मांडले आहे. या दरम्यान शिवांगी म्हणतेय की, ‘खतरो के खिलाडी 12’मध्ये जाण्यासाठी ती खूप उत्सुक आहे, शिवाय हा तिचा आवडता रियालिटी शो सुद्धा आहे.

‘खतरो के खिलाडी 12’ बद्दल शिवांगी जोशी म्हणाली की, हा माझा आवडता शो आहे. तसेच हा माझा पहिला रियालिटी शो असून ही माझ्यासाठी खूप चांगली संधी आहे. इथे आपल्याला अनेक प्रकारचे स्टंट करायची संधी मिळते जी आपण साधारण आयुष्यात करू शकत नाही. त्यामुळे मला ही संधी मिळताच ती लगेच स्वीकरली.

शिवांगी जोशीला इंटरव्यू दरम्यान विचारण्यात आलं की, ‘खतरो के खिलाडी 12’ नंतर ‘बिग बॉस 16’ मध्ये सुद्धा जाणार का? त्यावर शिवांगी जोशी म्हणाली की, “मला ठाऊक आहे की जे सेलिब्रिटी ‘खतरो के खिलाडी’ मध्ये दिसतात ते नंतर ‘बिग बॉस’मध्ये सुद्धा दिसतात. परंतु खरंच मला पुढचं काहीही माहित नाही. माझं संपूर्ण लक्ष आता फक्त ‘खतरो के खिलाडी’ वर आहे. कारण सध्या हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टींचा विचार करण्यासाठी मला अजिबात वेळ नाही.”

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘बालिका वधू 2’ केलं आहे काम
शिवांगी जोशी याआधी ‘बालिका वधू 2’ मध्ये दिसली होती. या कार्यक्रमात शिवांगीने ‘आनंदी’ ही भूमिका साकारली होती. याशिवाय तीने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत दिसली होती.


हेही वाचा :सेटवरून रात्री घरी परतताना अभिज्ञा भावे सोबत ठाणे परिसरात घडली धक्कदायक घटना