‘lal singh chaddha’ नंतर आमिर खानने सुरू केली नव्या चित्रपटाची तयारी

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक नेहमीच आतुरतेने वाट बघतात. आमिर खान एका वेळी फक्त एकाच चित्रपटासाठी काम करतो. येत्या काळात आमिर खानचा ‘लाल सिंह चढ्ढा’ हा बहुचर्चित चित्रपट रिलीज होणार असून आता आमिरने आणखी एका नवा चित्रपट साइन केला आहे.

आमिर खानने या दिग्दर्शकासोबत मिळवला हात
सूत्रांच्या माहितीनुसार आमिर खानने ‘शुभ मंगल सावधान’ चित्रपटाचे दिग्दर्शक आरएस प्रसन्ना यांच्याशी नव्या प्रोजेक्टसाठी हात मिळवणी केली आहे. मात्र या चित्रपटाबाबत अजून काही बातमी समोर आली नाही. ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर आमिर या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. आमिर खानचा हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो.

आमिर खानला करायचंय तरूण दिग्दर्शकांसोबत काम

आमिर खानला नव्या आणि तरूण दिग्दर्शकांसोबत काम करण्याची इच्छा आहे. आमिर गेल्या अनेक दिवसांपासून आरएस प्रसन्नाच्या संपर्कात होता. आमिर खानचा ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे.

११ ऑगस्टला रिलीज होणार लाल सिंह चढ्ढा

आमिर खान आणि करिना कपूरचा ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपट येत्या ११ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटातून टॉलिवूड सुपरस्टार नागा चैतन्य प्रथमच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

 


हेही वाचा :KRK च्या कॉन्ट्रोव्हर्शिअल पुस्तकाचा व्हिडीओ शेअर करताच चाहत्यांनी केलं बिग बींना ट्रोल