‘लाल सिंह चड्ढा’ फ्लॉप होताच आमीर खानने घेतली राज ठाकरेंची भेट

आमीर खान आणि राज ठाकरे यांची झालेली भेट पाहून सगळीकडे चर्चा सुरू झाल्या आहेत. आमीर खान 17 ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचला.

बॉलिवूड अभिनेता आमीर खान सध्या त्याच्या लाल सिंह चड्ढा चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. 11 ऑगस्ट रोजी लाल सिंह चड्ढा प्रदर्शित झाला. परंतु अद्याप चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली दिसून येत नाही. शिवाय सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी देखील केली जात आहे. दरम्यान, आमीर खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याचे माहिती समोर आली आहे.

आमीर खान आणि राज ठाकरे यांची झालेली भेट पाहून सगळीकडे चर्चा सुरू झाल्या आहेत. आमीर खान 17 ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचला. जवळपास 1 तास आमीर खान आणि राज ठाकरे यांच्यामध्ये संभाषण झालं.

मागील काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी आमीर खानने राज ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक दिग्गज मंडळी राज ठाकरेंची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी येत आहेत.

दरम्यान, लाल सिंह चड्ढाच्या चर्चेदरम्यान आमीर खानने राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे अनेकजण विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.  सध्या बॉलिवूड चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई पाहता येत नाही. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या लाल सिंह चड्ढा चित्रपटाने आत्तापर्यंत केवळ 37 कोटींची कमाई केली आहे. मात्र या चित्रपट तयार करण्यासाठी तब्बल 200 कोटींचा खर्च करण्यात आला होता.


हेही वाचा :बॉलिवूड कलाकारांनी चित्रपटाची माफक फी घ्यावी; भाजपा नेत्याचा सल्ला