मुस्लीम तरुणाशी लग्न केल्यानंतर स्वराला विहिंपने करून दिली श्रद्धा हत्याकांडाची आठवण

अभिनेत्री स्वरा भास्कर हिने नुकतेच समाजवादी पक्षाचे फहाद अहमद याच्याशी लग्न केले आहे. याबाबतची माहिती तिने तिच्या सोशल मीडिया अकांऊटवरून दिली आहे. एका मुस्लिम मुलाशी लग्न केल्याने स्वराला काही लोकांनी ट्रोल केले. तर तिच्यावर आता विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी निशाणा साधला आहे.

After marrying a Muslim Man, Swara was reminded of Shraddha murder case by the VHP

अभिनेत्री स्वरा भास्करच्या लग्नानंतर वेगवेगळी वक्तव्ये समोर येत आहेत. स्वरा भास्करने १६ फेब्रुवारीला बरेलीच्या फहाद अहमदशी लग्न केले. त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळी वक्तव्ये येऊ लागली आहेत. अशा परिस्थितीत आता विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी स्वराच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यावर चर्चा सुरू झाली आहे.

चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्कर आणि बरेलीतील समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद यांच्या लग्नानंतर विश्व हिंदू परिषदेच्या फायरब्रँड नेत्या साध्वी प्राची यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या साध्वी प्राचीने सोमवारी बरेलीमध्ये स्वरा-फहादच्या लग्नावर मोठे वक्तव्य केले. साध्वी प्राची यांनी स्वराच्या लग्नाबाबत म्हंटले आहे की, अभिनेत्रीने श्रद्धाचे फ्रीजमध्ये ठेवलेले 35 तुकडे लक्षात ठेवावेत. मुली जेव्हा असे पाऊल उचलतात तेव्हा त्या कधी सुटकेसमध्ये तर कधी गोणीमध्ये सापडतात. साध्वी प्राची पुढे म्हणाल्या की, आयएएस टीना दाबी यांनीही असेच केले होते. स्वरा भास्करमध्ये तिच्यावर केलेले काही संस्कार राहिले असतील तर ती लवकरच घरी परतेल.

साध्वी प्राची रविवारी आमला येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत आयोजित महिला समन्वय परिषदेत सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी लोकांना धार्मिक शिक्षणासोबतच मुलींना उच्च शिक्षण देण्याचे आवाहन करून सांगितले की, आता सनातन्यांना आपल्या मुलींना शस्त्रे वापरायला शिकवावी लागणार आहेत. मुलींना स्वावलंबी बनवा. महापुरुषांचे चरित्र जीवनात आणावे लागते. त्याचबरोबर बहेडी येथे नवविवाहित जोडप्याच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. रिसॉर्ट बुक केले आहे. रिसेप्शनची तारीखही समोर आली आहे. 19 मार्च रोजी रिसेप्शन होणार आहे, असे म्हणतं स्वराच्या लग्नाबाबत बोलण्यास सुरुवात केली.

हेही वाचा – महिरावणीच्या कृतिका, ऋतुजाची अवकाश भरारी; नाशिकच्या शिरपेचात रोवला मानाचा तूरा

चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्कर बरेलीची सून झाली आहे. तिचा नवरा फहाद अहमद हा बरेलीच्या बहेडी येथील रहिवासी आहे. दोघांचेही नुकतेच लग्न झाले, पण हे लग्न कायदेशीर करण्यासाठी 16 मार्च रोजी दिल्लीतील साकेत येथील हॉटेलमध्ये सार्वजनिक विवाह सोहळा पार पडणार आहे. 19 मार्च रोजी बहेडी येथील फहादच्या वडिलोपार्जित निवासस्थानी दावत-ए-वलीमा (स्वागत) कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. फहाद अहमद हा बहेडी येथील इस्लाम नगर परिसरात राहतो. काँग्रेस नेते आणि समाजसेवक जरार अहमद यांचा तो मुलगा आहे.

दरम्यान, साध्वी प्राची यांच्या यांनी पुन्हा एकदा श्रद्धा वालकर हत्याकांडाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. अफताब पुनावाला याने श्रद्धाची हत्या करून तिचे 35 तुकडे केले होते. यानंतर त्याने ते एक एक करून दिल्लीतील जंगलात नेऊन फेकले. तर तिच्या कवटीची आणि हाडांची मिक्सरमध्ये पावडर केल्याची धक्कादायक माहिती काही दिवसांपूर्वी आफताबने पोलिसांना दिली. श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे देशात खळबळ माजली होती.