घरताज्या घडामोडीAryan drug case:आर्यनच्या अटकेचा शाहरुखला फटका, byju's ने बंद केल्या जाहिराती

Aryan drug case:आर्यनच्या अटकेचा शाहरुखला फटका, byju’s ने बंद केल्या जाहिराती

Subscribe

byju'sला प्रमोट करण्यासाठी शाहरुखला एका वर्षाला ३-४ कोटी रुपये मिळत होते

अभिनेता शाहरुखचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryab Khan) ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर शाहरुखला मोठा  फटका बसला असून बायजूस (byju’s) या एडटेक स्टार्ट-अप कंपनीने शाहरुखच्या सगळ्या जाहिराती बंद केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार byju’sला प्रमोट करण्यासाठी शाहरुखला एका वर्षाला ३-४ कोटी रुपये मिळत होते. मात्र byju’sने शाहरुखच्या जाहिराती बंद केल्याने शाहरुखच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

शाहरुख २०१७ पासून byju’sचा ब्रँड अँम्बेसेडर आहे. byju’sसोबत सध्या शाहरुखकडे हुंदाई, रिलायन्स जिओ,एलजी, दुबई टुरिझम यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या जाहिराती देखील आहेत. अद्याप तरी byju’s वगळता इतर कोणत्याही कंपन्यांनी शाहरुखच्या जाहिराती बंद केलेल्या नाहीत. byju’s हा शाहरुखच्या स्पॉन्सरशिप डिल्समधला सर्वात मोठा ब्रँड होता. मात्र आर्यन खानच्या अटकेनंतर byju’sच्या जाहिराती आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांकडे शाहरुख पाठ फिरवावी लागणार आहे.

- Advertisement -

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर शाहरुख खानला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. प्रामुख्याने बायजूस अॅपच्या जाहिरातीवरुन लोकांनी शाहरुख आणि कंपनीला धारेवरच धरले. कंपनी शाहरुखला बायजूस लर्निंग अँपचा ब्रँड अँम्बेसेडर बनवून काय दाखवू इच्छिते आहे? शाहरुख आपल्या मुलाला हेच शिकवतो का असे म्हणत ट्रोल करण्यात आले आहेत. byju’s आणि शाहरुख यांच्यावर अनेक मीम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सगळ्या प्रकरणामुळे byju’s कंपनीची प्रतिमा खराब होत असल्याचे कंपनीने शाहरुखला ब्रँड अँम्बेसेडर म्हणून काढून टाकले आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा – Aryan Khanला सोडा, त्याच्यासोबत राजकारण केलं जातयं – रवीना टंडण भडकली

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -