घरमनोरंजनन्यूड फोटोनंतर रणवीर सिंगची पहिली पोस्ट; सिद्धार्थ जाधवने कमेंट करत म्हटले 'भावा...'

न्यूड फोटोनंतर रणवीर सिंगची पहिली पोस्ट; सिद्धार्थ जाधवने कमेंट करत म्हटले ‘भावा…’

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह न्यूटफोटो शूटमुळे चांगलाच चर्चेत आहे. या फोटोशूटमुळे रणवीरवर टीकेची झोड उठवली जात आहे. तर काहींनी त्याचे समर्थनही केले आहे. रणवीरने एका मासिकासाठी हे न्यूड फोटोशूट केले होते. मात्र या फोटोंवरून आता उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. अनेकांनी रणवीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर अनेकांनी त्याच्यावर मिम्स व्हायरल केले आहे. मात्र बॉलिवूडसह अनेक कलाकारांनी त्याचे समर्थन केले आहे. अशात न्यूड फोटोशूटनंतर रणवीर सिंगने एक पोस्ट शेअर केली आहे. जी पोस्ट आता चांगलीच व्हायरल होत आहे.

रणवीर सिंग इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलाच सक्रिय असतो. नुकताच रणवीर सिंगला आंतरराष्ट्रीय जाहिरात संघटनेकडून ब्रँड एंडोर्सर ऑफ द इयर या पुरस्कारने गौरवण्यात आले. या पुरस्काराची एक पोस्ट रणवीरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहे. यात त्याने पुरस्कार मिळाल्याचा फोटोही शेअर केला आहे.

- Advertisement -

पुरस्कार हातात पकडल्याचा फोटो पोस्ट करत रणवीरने कॅप्शनमध्ये लिहिले की, मी एका अॅडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये कॉपी रायटर म्हणून माझा प्रवास सुरु केला आणि आता मला एका प्रतिष्ठित ब्रँड एंडोर्सर ऑफ द इअर या पुरस्काराने गौरवण्यात आले. आयुष्याचे एक चक्र पूर्ण झाल्यासारखे वाटतेय. आंतरराष्ट्रीय जाहिरात संघटनेचे खूप खूप धन्यवाद”

रणवीरने इन्स्टाग्रामवर या पुरस्कार सोहळ्यातील काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोतून पुरस्कार मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे. दरम्यान या फोटोवर आता मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही कमेंट केली आहे. रणवीरच्या या फोटोवर कमेंट करत सिद्धार्थने लिहिले की, ‘खूप खूप अभिनंदन भावा…’ फक्त सिद्धार्थ जाधवनेच नाही इतर बॉलिवूड कलाकारांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

- Advertisement -

दरम्यान रणवीर सिंगनेही पेपर नावाच्या एका अमेरिकन मासिकासाठी हे न्यूड फोटोशूट केले होते. हे फोटो रणवीरने खूप आधी शूट केले होते मात्र बिझी शेड्यूलमुळे त्याने ते उशीरा पोस्ट केले. मात्र रणवीरचे हे न्यूड फोटो समोर येताच अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोंमध्ये रणवीरच्या अंगावर एकही कपडा दिसत नाही. तर काही फोटोंमध्ये केवळ त्याने अंर्तवर्स्त्र परिधान केली आहेत. दरम्यान रणवीरच्या या न्यूड फोटोशूटविरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रणवीर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.


Receipe : अगदी सोप्या पद्धतीने बनवा नारळी बर्फी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -