घरमनोरंजन'पठाण' नंतर सोशल मीडियावर शाहरुखच्या 'जवान' चित्रपटाची चर्चा; लूक झाला लीक

‘पठाण’ नंतर सोशल मीडियावर शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाची चर्चा; लूक झाला लीक

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. 25 जानेवारी रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. 7 दिवसात चित्रपटाने करोडोंची कमाई केली असून भारतातील अनेक चित्रपटांना मात देत कमी काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. दरम्यान, अशातच शाहरुखच्या आगामी ‘जवान’ चित्रपटातील लूक लीक झाला आहे. शाहरुखचा हा लूक पाहून चाहते आणखी खूश झाले आहेत.

शाहरुखचा ‘जवान’ चित्रपटातील लूक लीक

- Advertisement -

‘पठाण’ नंतर शाहरुख ‘जवान’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात टॉलिवूड अभिनेत्री नयनतारा देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. नुकताच या चित्रपटातील शाहरुखचा शूटिंगदरम्यानचा एक लूक लीक झाला आहे. ज्यामध्ये शाहरुखच्या चेहऱ्या पट्टी बांधलेली दिसत आहे. यात शाहरुखचे मोठे केस दिसत आहेत. शाहरुखचा फोटो पाहून चाहते चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत.

‘जवान’ चित्रपटात दिसणार हे कलाकार
शाहरुख व्यतिरिक्त अभिनेत्री नयनतारा देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. या अभिनेते विजय सेतुपति आणि थलपति विजय देखील कॅमियो भूमिका साकारतील. 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.

- Advertisement -

‘पठाण’ देशभरात हाऊसफुल

भारतातील अनेक चित्रपटगृहांबाहेर ‘पठाण’ हाऊलफुल झाल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. तसेच परदेशात देखील रेकॉर्ड बनवायला सुरुवात केली आहे. प्रेक्षक शाहरुखचा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अनेकजण शाहरुख आणि दीपिकाचं कौतुक करत आहेत. या चित्रपटाने आत्तापर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण 322 कोटी कमावले आहेत. जगभरातून या चित्रपटाने 500 कोटींचा टप्पा पार केला आहे.


हेही वाचा :

बॉक्स ऑफिसवर फक्त शाहरुखच्या ‘पठाण’चा बोलबाला; 7 दिवसांत जमावला इतका गल्ला

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -