घरमनोरंजन'या' अभिनेत्याचा फोटो शेअर करत जॉनसिनाने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

‘या’ अभिनेत्याचा फोटो शेअर करत जॉनसिनाने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Subscribe

सध्या भारतात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी होत आहे. सोशलमिडीयावर तर शुभेच्छांचा पाऊस पडला आहे. सर्वसामान्यांप्रमाणे सेलेब्रेटीही मोठ्या आनंदात दिवळी साजरी करताना दिसतात. विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यातील एक शुभेच्छा सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

- Advertisement -

WWE सुपरस्टार जॉन सिना याने देखील सर्व भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण याने दिलेल्या शुभेच्छा थोड्या खास आहेत. कारण जॉनने शुभेच्छा देताना बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याचा एक फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

- Advertisement -

सध्या जॉनने केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासात तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रणवीर सिंग हा जॉन सिनाच्या सर्वात आवडत्या कलाकारांपैकी एक आहे असे म्हटले जाते. याआधीही जॉनने त्याच्या गल्ली बॉय या चित्रपटातील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

त्यामुळे जॉनने रणवीरचा फोटो शेअर करत सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आता त्याने हा फोटो का शेअर केला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -