Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन आई माझी काळूबाई मालिकेला प्राजक्तानंतर वीणा जगतापचाही राम राम

आई माझी काळूबाई मालिकेला प्राजक्तानंतर वीणा जगतापचाही राम राम

मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री वीणा जगताप हीने देखील मालिकेला राम राम केल्याचं कळतय .वीणाने आरोग्याचे कारण देत ही मालिका सोडली असल्याचा खूलासा केला आहे.

Related Story

- Advertisement -

सोनी मराठी वरील सतत वादाच्या भोवऱ्यात असणारी मालिका म्हणजे ‘आई माझी काळूबाई’ . पण आता पुन्हा एकदा या मालिकेची चर्चा सुरू झाली आहे. कारण मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री वीणा जगताप हीने देखील मालिकेला राम राम केल्याचं कळतय .वीणाने आरोग्याचे कारण देत ही मालिका सोडली असल्याचा खूलासा केला आहे.

- Advertisement -

अभिनेत्री वीणा हीच्या जागी आता आणखीन एका नवीन नायिकेची वर्णी लागणार आहे. फ्रेशर्स,अग्निहोत्री फेम अभिनेत्री ‘रश्मी अनपट’ ही आर्या ची भूमिका साकारणार आहे. रश्मी ने मालिकेच्या शुटींगला सुरूवात देखील केली आहे. तसेच रश्मी वर चित्रीत करण्यात आलेला भाग सुद्धा प्रसारित करण्यात आला आहे. मालिका सूरु झाल्यापासून सतत काही ना काही बदल या मालिकेत होत आहेत. काही दिवसांपूर्वी या मालिकेची नायिका प्राजक्ता गायकवाडची वागणूक योग्य नसल्याचे निर्मात्या व अभिनेत्री अलका कुबल यांनी म्हटलं होत. तसेच प्राजक्ता आणि अलका कुबल यादोघींमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अभिनेत्री वीणा जगतापची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती.तसेच कोरोना व्हायरसमुळे काही काळ थांबलेल शूटींग आणि जेष्ठ अभिनेत्री आशालता वागबावकर यांच शुटींगदरम्यान कोरोनामुळे झालेलं निधन यामुळे मलिकेला कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागलं होत.


हे ही वाचा- ‘तारे जमीन पर’चं दिग्दर्शन आमीर खान ने नाही मी केलं…अमोल गुप्ते

- Advertisement -