घरमनोरंजनपंतप्रधान मोदी आणि रजनीकांतनंतर अक्षय कुमार Man Vs Wild मध्ये दिसणार

पंतप्रधान मोदी आणि रजनीकांतनंतर अक्षय कुमार Man Vs Wild मध्ये दिसणार

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आपल्या चित्रपटांद्वारे चाहत्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही आहे. अ‍ॅक्शन चित्रपट असो किंवा एखाद्या सत्य घटनेवर आधारित चित्रपट असो, अक्षय कुमारने प्रत्येक वेळी आपल्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. दरम्यान, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. अक्षय आता बेअर ग्रिल्स सोबत ‘Man Vs Wild’ मध्ये दिसणार आहे. अक्षयने स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्याने इंस्टाग्रामवर शोची एक छोटी क्लिप शेअर केली आहे. ‘Man Vs Wild’ चा हा भाग किती रोमांचक असणार आहे याचा अंदाज या व्हिडीओवरुन लावला जाऊ शकतो.

यापूर्वीच इंटू दी वाइल्ड विथ बीयर ग्रिल्सविषयी जगात आणि भारतात कुतुहल, उत्साह आहे, आता शोमधील अक्षय कुमारच्या एन्ट्रीने यात अधिकची भर पडली आहे. याआधी रजनीकांत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत बेअर ग्रिल्सने जंगल सफारी केली होती. यावेळी अक्षय कुमार सोबत बेअर ग्रिल्सने जंगल सफारी करणार आहे. व्हिडीओमध्ये अक्षयचा वाइल्ड अवतार दिसत असून अक्षय नदी ओलांडताना आणि झाडाच्या वेलींवर झूलताना दिसत आहे. अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. यावेळी त्याने “तुम्हाला वाटते की मी वेडा आहे… पण फक्त वेडाच जंगलात जातो,” असा मथळा देखील लिहिला आहे. हा शो ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता आणि १४ सप्टेंबर रात्री ८ वाजता डिस्कवरी चॅनेलवर पाहता येणार आहे.

 

View this post on Instagram

 

- Advertisement -

You thinking I mad… but mad only going into the wild. #IntoTheWildWithBearGrylls @beargrylls @discoveryplusindia @discoverychannelin

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

- Advertisement -

जानेवारीत केली होती शूटींग

या शोची शूटींग अक्षय कुमारने बेअर ग्रिल्ससोबत ३० जानेवारी रोजी कर्नाटकातील बांदीपुर टायगर रिझर्व येथे केल्याची माहिती आहे. शूटिंग सुमारे ६ तास चालली. इथल्या विमानतळावरील अक्षयची छायाचित्रेदेखील समोर आली आहेत. अक्षयच्या आधी बेअर ग्रिल्सने सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत बांदीपूर टायगर रिझर्व येथे शूटींग केली होती.


हेही वाचा – NEET 2020 Exam: १३ सप्टेंबरला होणार परीक्षा, लवकरच मिळणार प्रवेशपत्र


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -