घरताज्या घडामोडीOo Antava नंतर चमकलं Samanthaचं नशीब! 3 बॉलिवूड सिनेमांची ऑफर

Oo Antava नंतर चमकलं Samanthaचं नशीब! 3 बॉलिवूड सिनेमांची ऑफर

Subscribe

समांथाला यश राज फिल्मने तीन सिनेमांची ऑफर देण्यात आली असून समांथाला या सिनेमांची मोठी रक्कम दिली जाणार आहे. समांथाने देखील या प्रोजेक्ट्सवर काम करण्यासाठी पसंती दर्शवल्याचे म्हटले जात आहे.

अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun )  ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: The Rise)   मधील अभिनेत्री समांथा प्रभूने (Samantha Prabhu )  केलेलं ऊ अंतावा ( Oo Antava )  आयटम साँग सध्या चांगलचं गाजतय. या गाण्याने सिनेमा सुपर डूपर हिट झालाय. समांथाचा हा नवा अवतार तिच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतील उतरला आहे. खरंतर या आयटम साँगने आता समांथाचा नशीबच चमकलं आहे. ऊ अंतावा या गाण्यानंतर समांथाला तब्बल 3 बिग बजेट सिनेमांची ऑफर आली आहे. या सिनेमातून समांथा बक्कळ पैसे मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप याविषयी कोणतीही ऑफिशियल घोषणा करण्यात आलेली नाही.

समांथाने अमेझॉन प्राइमच्या द फॅमिली मॅन2 या वेब सीरीजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. तिच्या दर्जेदार अभिनयाने तिने सर्वांनाच इंप्रेस केले आहे. हिंदी वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तांनुसार, बॉलिवूड रिपोर्ट्स मध्ये असे म्हटले गेले आहे की, समांथाला यश राज फिल्मने तीन सिनेमांची ऑफर देण्यात आली असून समांथाला या सिनेमांची मोठी रक्कम दिली जाणार आहे. समांथाने देखील या प्रोजेक्ट्सवर काम करण्यासाठी पसंती दर्शवल्याचे म्हटले जात आहे. आता केवळ ऑफिशयल माहिती येणे बाकी आहे.

- Advertisement -

बॉलिवूडप्रमाणेच समांथाकडे अनेक साउथ सिनेमांच्या ऑफर्स देखील आहेत. आगामी काळात समांथा काही इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्सवर काम करणार आहे. ज्यात Kaathu Vaakula Rendu Kaadhal हा तमिळ सिनेमा, शांकुतलम, यशोदा सारखे तेलुगू सिनेमा आणि अरेंजमेंट्स ऑफ लव्ह सारखा इंटरनॅशन सिनेमा आहे.

पुष्पा सिनेमातील ऊ अंतावा हे आयटम साँग सध्या ट्रेंडमध्ये आहे. प्रेक्षकांकडून या गाण्याला शानदार प्रतिसाद मिळतोय. समांथाने सिनेमातील 3 मिनिटांच्या गाण्यासाठी 5 करोड रुपये घेतल्याचे म्हटले जात आहे. ऊ अंतावा या गाण्याची कोरिओग्राफी ही गणेश आचार्य याने केली असून या गाण्यावर सध्या अनेक जण थिरकताना दिसत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – गणेश आचार्यची Oo Antava वर हुक स्टेप पाहून अल्लू अर्जुन अन् समांथाचा तूफान लाफ्टर

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -