नुकत्याच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामुळे अनेक कलाकारांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. दरम्यान रश्मिकानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा देखील असाच एक फेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काजोलचा फेक व्हिडीओ व्हायरल
View this post on Instagram
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला कपडे बदलताना दिसत आहे ज्याला तंत्रज्ञानाचा वापर करून काजोलचा चेहरा लावण्यात आला आहे. काजोलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर तिचे चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना ‘काजोल देवगण कॅमेऱ्यात कपडे बदलताना कैद झाली’ असे लिहिलं आहे.
मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार ती काजोल नसून सोशल मीडियावरील प्रसिद्ध इंफ्लुएंजर आहे. जिने खूप आधी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला होता, जो खूप व्हायरल झाला होता.
रश्मिकाचा व्हायरल व्हिडीओ
व्हायरल होत झालेल्या रश्मिकाच्या व्हिडीओमध्ये एक तरुणी काळ्या रंगाच्या डीप नेक टाइट जिम वेअरमध्ये दिसली होती शिवाय या व्हिडीओत त्या तरुणीचा चेहरा हुबेहुब रश्मिकासारखा दिसत होता. पण ती रश्मिका नसून झारा पटेल होती.रश्मिका मंदान्नाचा हा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्याने अमिताभ बच्चनही संतापले होते. बिग बींनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती.