घरमनोरंजनशाहिदच्या जन्मानंतर एकट्याने पार पाडली होती जबाबदारी, नीलिमा अझीमचा खुलासा

शाहिदच्या जन्मानंतर एकट्याने पार पाडली होती जबाबदारी, नीलिमा अझीमचा खुलासा

Subscribe

शाहिदच्या आईवडीलांचा घटस्फोट झाला त्यावेळी तो साडेतीन वर्षाचा होता. वयाच्या २१ व्या वर्षी नीलिमा अझीम या गरोदर राहिल्या होत्या.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर त्याच्या करिअरसोबतच कुटुंबालाही प्राधान्य देतो. त्याच्या जबरदस्त अभिनयासोबतच आई, भाऊ, पत्नी आणि मुलांनाही पुरेसा वेळ देणारा हा अभिनेता या कारणांमुळेही चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे. मात्र शाहिदच्या जन्मानंतर त्याची जबाबदारी सांभाळण्यापर्यंतचा प्रवास त्याच्या आईसाठी सोपा नव्हता. नीलिमा अझीम यांनी पंकज कपूर यांच्यासोबतच्या नात्यातून वेगळं होण्याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. शाहिदच्या आईवडीलांचा घटस्फोट झाला त्यावेळी तो साडेतीन वर्षाचा होता. वयाच्या २१ व्या वर्षी नीलिमा अझीम या गरोदर राहिल्या होत्या. मात्र नीलिमा यांना दिवस गेल्याची माहिती होण्यापूर्वीच पंकज कपूर यांनी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वात नशीब आजमावण्यासाठी मुंबई गाठली होती. शाहिदच्या जन्मानंतर आपल्या पालकांनीच त्याच्या संगोपनात मोलाची मदत केली असल्याची बाबही त्यांनी सर्वांसमोर आणलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

 शाहिदचे आई-वडील विभक्त झाल्याचे कळताच शाहिदची याबाबत काय प्रतिक्रिया होती,याबाबत सांगताना, ‘तो अगदीच लहान होता. तो साडेतीन वर्षांचा होता. दिल्लीत त्याचा जन्म झाला. जेव्हा पंकजनं मला फार आधीच त्याच्या करिअरच्या निर्णयामुळे एकटं सोडून मुंबई गाठली होती आणि मी आईवडिलांसोबत राहत होते’. आम्हाला मी गरोदर असल्याचं कळण्यापूर्वीच पंकज कपूर यांनी मुंबई गाठल्याचं ही त्या म्हणाल्या. पतीनं करिअरसाठी घेतलेल्या निर्णयात आपण त्यांना साथ दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.आपल्या गतकाळातील दिवस समोर आणत , माझ्या गरोगर काळात माझ्या पालकांनी आणि भावानं काळजी घेतली होती, किंबहुना शाहिदच्या जन्मानंतरही मी पालकांच्याच घरी होते व पंकज आणि माझं एकत्र घर कधीही नव्हतं असे त्या म्हणाल्या.

- Advertisement -

हे वाचा-

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -