घरमनोरंजनगुगल सर्चमध्ये 'या' अभिनेत्याला विवेकने टाकलं मागे

गुगल सर्चमध्ये ‘या’ अभिनेत्याला विवेकने टाकलं मागे

Subscribe

जकीय नेत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी त्याच्यावर टीका केली होती. यामुळे विवेक चर्चेत आला होता.

गेले काही दिवस अभिनेता विवेक ओबेरॉय एका ट्वीटमुळे सतत चर्चेत आहे. एग्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर केलेल्या एका मीममुळे अभिनेता विवेक ओबेरॉय चांगलाच वादात सापडला. सलमान खान,ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन या तिघांचे फोटो वापरत एक मीम शेअर केल होतं. त्यावरून राजकीय नेत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी त्याच्यावर टीका केली होती. यामुळे विवेक चर्चेत आला होता. राज्य व केंद्रीय महिला आयोगानं महिलेचा अपमान केल्याबद्दल त्याला नोटीसही पाठवली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे गुगलवर नेटकऱ्यांना विवेकबद्दलची इतकी उत्सुकता वाढली की सर्चमध्ये त्याने सलमान खानलाही मागे टाकलं आहे.

vivek oberoi

- Advertisement -

काय आहे मीम
एक्झिट पोलसमोर आल्यापासून हे मीम व्हायरल होते आहे. हेच मीम विवेक ओबेरॉयने ट्विटरवर पोस्ट केले आहे. या मीममध्ये तीन फोटो आहेत. पहिल्या फोटोत ऐश्वर्या राय सलमान खानसोबत असलेला फोटो आहे त्याखाली ओपिनियन पोल असे लिहिले आहे. दुसऱ्या फोटोत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय असा फोटो आहे. त्या फोटोत एक्झिट पोल असे लिहिले आहे. त्यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अराध्या यांचा फोटो आहे त्याफोटोखाली रिझल्ट असं लिहिलं आहे. शेअर केलेल्या मीमवरून होणारा वाद पाहता विवेकने ते ट्विट डिलीट कर माफी मागितली आहे.

vivek-oberai tweet

- Advertisement -

तेव्हापासून विवेक ओबेरॉय गुगलवर मोठ्या प्रमाणावर सर्च केला जात आहे. सलमानखान पेक्षाही विवेकला लोकं गुगलवर सर्च करत आहेत. गुगल ट्रेण्डच्या मते पुद्दुचेरी, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गोवा या राज्यांमध्ये विवेकबाबत सर्च केलं गेलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -