‘शेरशाह’ नंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी झळकणार ‘या’ सिनेमात

सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि कियारा सध्या एका रोमाँटिक चित्रपटासाठी बोलणी करत आहेत. तसेच या चित्रपटामध्ये दोघे रोमांस करताना दिसू शकतात

‘शेरशाह’ चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीची केमिस्ट्रीने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ पाडली होती. या चित्रपटातील गाण्यांचे ही मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात होते, याशिवाय या चित्रपटासाठी या जोडीने अनेक पुरस्कारही पटकावले आहेत. या चित्रपटानंतर कियारा आणि सिद्धार्थचे नाव सतत चाहत्यांच्या ओठांवर असते. दरम्यान आता ही जोडी पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि कियारा सध्या एका रोमाँटिक चित्रपटासाठी बोलणी करत आहेत. तसेच या चित्रपटामध्ये दोघे रोमांस करताना दिसू शकतात. सूत्रांच्या मते, सिद्धार्थ आणि कियाराला या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली होती, मात्र दोघांनीही अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. सिद्धार्थ आणि कियाराने या चित्रपटात एकत्र काम करण्याचा विचार केला तर ही जोडी पुन्हा एकत्र पाहायला मिळेल.

सिद्धार्थ आणि कियाराचा व्हिडिओ झाला होता व्हायरल
मागील काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ आणि कियाराला बांद्रामधील एका घरामध्ये जाताना स्पॉट करण्यात आलं होतं. त्यानंतर या दोघांमध्ये सर्व काही ठिक असल्याचे म्हटले जात होते. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.

कियाराचा ‘भूल भुलैया २’ आणि ‘जुग जुग जियो’ बॉक्स ऑफिसवर करतोय कल्ला

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

सध्या कियारा अडवाणी तिच्या ‘भूल भुलैया २’ आणि ‘जुग जुग जियो’ या दोन्ही चित्रपटांचे सक्सेस एन्जॉय करत आहे. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.