घरताज्या घडामोडीअग्रिमा जोशुआनंतर 'या' मराठी अभिनेत्रीने केलं वादग्रस्त वक्तव्य, सोशल मीडियावर झाली ट्रोल!

अग्रिमा जोशुआनंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीने केलं वादग्रस्त वक्तव्य, सोशल मीडियावर झाली ट्रोल!

Subscribe

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपची शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वाद निर्माण झाला आहे. जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या व्हिडिओनंतर शिवप्रेमींनी तिच्यावर टीका केली आहे. या पाठोपाठ आता मराठी अभिनत्री केतकी चितळेने फेसबुक लिहिलेल्या पोस्टमुळे पुन्हा एकदा तीला ट्रोल करण्यात आले आहे.

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे. तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मनसेनंही विरोध करत संबंधित स्टुडिओची तोडफोड केली. या वादानंतर आता तो वादग्रस्त व्हिडीओसुद्धा हटवण्यात आला आहे.

- Advertisement -
Agrima joshua

 

शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच…

Posted by Ketaki Chitale on Friday, July 10, 2020

- Advertisement -

केतकीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा!

सोशल मिडीयावर ‘मराठी’ असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे २० ते २५ वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात.

अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!! सुधारणा करा बाळांनो, शिका. असंही केतकीने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे.

केतकीने आपल्या पोस्टमध्ये  छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे केतकीला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.


हे ही वाचा – कोरोना रूग्णाला वॉर्डमध्ये कुत्र्याबरोबर ठेवून कर्मचारी गायब!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -