Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन अदा शर्माचा अपघात; ट्वीट शेअर करत दिली प्रकृतीची माहिती

अदा शर्माचा अपघात; ट्वीट शेअर करत दिली प्रकृतीची माहिती

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सध्या तिच्या द केरळ स्टोरी या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. अशातच रविवारी अदा शर्मा आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा रस्त्यात अपघात झाला. अदा शर्मा आणि सुदीप्तो सेन करीमनगरला हिंदू एकता मोर्चात सहभागी होण्यासाठी निघाले होते. यादरम्यान, त्यांचा अपघाताचा झाला. त्यांच्याबाबत ही बातमी समोर आल्यानंतर चाहते खूप चिंतेत होते. अशातच आता ट्वीटकरुन अदा आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

अदा शर्माने ट्वीट शेअर करुन दिली चाहत्यांना माहिती

अभिनेत्री अदा शर्माने ट्वीटर अकाऊंटवरुन एक ट्वीट शेअर करत आपल्या आरोग्याबाबत माहिती शेअर केली आहे. ज्यात तिने लिहिलंय की, “मी पूर्णपणे बरी आहे. आमच्या अपघाताच्या बातम्या प्रसारित झाल्यामुळे, अनेक लोकांचे संदेश येत आहेत. आम्ही सर्व ठीक आहोत, काहीही गंभीर झालेले नाही, काळजी करण्यासारखे काहीही नाही. धन्यवाद” अदा शर्माच्या या ट्विटवर लोक भरपूर कमेंट करत आहेत आणि प्रतिक्रिया देत आहेत.

दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी देखील दिली अपघाताची माहिती

- Advertisement -

या अपघाताबाबत माहिती देताना ‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन म्हणाले, “आम्ही आमच्या चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी करीमनगर येथे एका युवक मेळाव्यात सहभागी होणार होतो. दुर्दैवाने, काही आपत्कालीन समस्येमुळे आम्हाला हे रद्द करावे लागले. आम्ही प्रवास करू शकलो नाही. करीमनगरच्या लोकांची मनापासून माफी मागतो. आमच्या मुलींना वाचवण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवला आहे. कृपया आम्हाला सपोर्ट करत रहा.”

 


- Advertisement -

हेही वाचा :

The Kerala Story च स्क्रिनिंग ब्रिटनमध्ये रद्द, कारण…

- Advertisment -