घरमनोरंजन'दृश्यम 2' चित्रपटाच्या घोषणेनंतर निर्मात्यांमध्ये अधिकृत हक्कावरुन झाला वाद

‘दृश्यम 2’ चित्रपटाच्या घोषणेनंतर निर्मात्यांमध्ये अधिकृत हक्कावरुन झाला वाद

Subscribe

या केसची सुनावणी लवकरच होणार असल्याचे वायकॉम 18 मोशन पिक्चर्स यांनी म्हंटले आहे.

‘दृश्यम’ चित्रपटाच्या भरघोस यशानंतर चाहते आता  ‘दृश्यम 2’ ची अतुरतेने वाट पाहत आहेत. एकीकडे मल्याळम चित्रपट  ‘दृश्यम 2’ च्या अभूतपूर्व यशानंतर याचा हिंदी वर्जन बनवण्यास मेकर्स सज्ज झाले आहेत. तसेच या हिंदी वर्जन मध्ये पुन्हा एकदा अभिनेता अजय देवगणची वर्णी लागणार आहे.  पण चित्रपटाच्या घोषने नंतर लगेचच चित्रपटासमोर मोठी अडचण उभी राहिली आहे. नुकतच चित्रपटाचे अधिकृत हक्क विकत घेतल्या नंतर अनेक वादाला तोंड फुटले आहे. चित्रपट निर्मात्यांमध्ये चित्रपटाच्या अधिकृत हक्कावरुन वाद निर्माण झाला आहे. आणि हा वाद इतका विकोपाला गेला की निर्मात्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आहे.

काय आहे नेमके कारण ?
‘दृश्यम 2’ चित्रपटाचे  हक्क पैनोरमा स्टूडियो आणि कुमार मंगत यांनी एकत्र मिळून खरेदी केले आहेत. माहितीनुसार दृश्यम चित्रपटाचा पहिला भाग पैनोरमा स्टूडियो,कुमार मंगत आणि वायकॉम 18 मोशन पिक्चर्स यांनी एकत्र मिळून खरेदी करून बनवला होता. पण यावेळेस फक्त पैनोरमा स्टूडियो,कुमार मंगत या दोघांनी मिळूनच दृश्यम 2 चित्रपटाचे हक्क खरेदी केले आहेत. यामुळे वायकॉम 18 मोशन पिक्चर्सने ‘दृश्यम 2’ चित्रपटावर अधिकृत हक्कावर दाखवत आपला दावा केला आहे. आणि कोर्टात धाव घेतली आहे. तसेच या केसची सुनावणी लवकरच होणार असल्याचे वायकॉम 18 मोशन पिक्चर्स यांनी म्हंटले आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – सिंगर लकी अली यांच्या निधनाच्या अफवांना उधाण,मैत्रिणी नफीसा अलीने ट्विट करत केला खुलासा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -