घरमनोरंजननेपोटीझमच्या वाद अडलेला करण जोहर लाँच करतोयं ४ नवे चेहरे

नेपोटीझमच्या वाद अडलेला करण जोहर लाँच करतोयं ४ नवे चेहरे

Subscribe

बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर नेपोटीझम वादात चांगलाच अडकला होता. करणने आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी किडस् लाँच केले आहे. त्यामुळे त्यावर अनेकांनी नेपोटीझमचे आरोप लावले. अनेक सेलिब्रिटी किडसने करण जोहर दिग्दर्शित सिनेमांतून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. त्यात आता करणने आपल्या धर्म कॉर्नरस्टोन एजन्सीअंतर्गत ४ नवे चेहरे बॉलिवूडमध्ये आणण्याची घोषणा केली आहे. सोशल मिडीयावर याबाबतची एक पोस्ट करत करण जोहरने ही माहिती दिली आहे. यातील एक नव्या चेहऱ्याची घोषणा नुकतीच करणने केली आहे. हा पहिला चेहरा म्हणजे बुलबुल फेम तृप्ती डिमरी. करणने तृप्ती डिमरा एक व्हिडिओ शेअर करत पहिल्या नावाची घोषणा केली. तृप्ती डिमर आत्तापर्यंत लैला मंजून आणि बुलबुल या चित्रपटांतून अधिक प्रसिद्धी झोतात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)


याप्रकारे करण आगामी तीन नव्या चेहरे रोज एक एक करुन रिव्हील करणार आहे. या चार नव्या चेहऱ्यांबद्दल करणने लिहिले आहे की, नवीन पिढीचे चार नवे चेहरे तुमच्यासमोर सादर करतोय याचा मला अभिमान आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

- Advertisement -

याबाबतचे व्हिडिओ ट्विट करणने शेअर करत लिहिले की, भारतीय चित्रपटसृष्टीत आम्ही नवे चेहऱ्यांना नेहमीच पाठिंबा दिला आहे. मग तो दिग्दर्शक असो, अभिनेता असो किंवा संगीतकार साऱ्यांनाच इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर अनेकांना करण जोहरवर नेपोटीझमचे आरोप लावले होते. यादरम्यान त्याला सोशल मिडियावरही बरेच ट्रोल केले गेले. त्यामुळे करणने काही दिवस सोशल मिडीयापासून दूर राहणे पसंत केले होते. त्यामुळे आरोपांमधून सुटण्यासाठी आता करण जोहर प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा- बिग-बींची बॉलिवूडमध्ये Half-Century; शेअर केला थ्रो बॅक फोटो, म्हणाले…

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -