घरमनोरंजनब्रेकअपनंतर शीजान तुनिषाच्या मेसेजला रिप्लाय देत नव्हता, मुंबई पोलिसांनी दिली माहिती

ब्रेकअपनंतर शीजान तुनिषाच्या मेसेजला रिप्लाय देत नव्हता, मुंबई पोलिसांनी दिली माहिती

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. हिंदी वाहिनीवरील ‘दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकरात होती. तिने मालिकेच्या सेटवरील मेकअप रुममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. वसईच्या कामन परिसरातील एका स्टुडिओमध्ये ही घटना घडली आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. शिवाय तिचे कुटुंबीय देखील पूर्णपणे खचून गेले आहेत. पोलिसांनी संशयित आरोपी शीजान खानला अटक केली आहे. दरम्यान, आता नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार तुनिषाच्या आत्महत्येनंतर शीजान खानने त्याच्या फोनमधील दुसऱ्या प्रेयसीसोबतचे चॅट डिलीट केले होते.

मुंबई पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, आरोपी शीजान खान इतर अनेक मुलींसोबत चॅट करायचा. त्याच्या फोनच्या तपासणी दरम्यान अनेक पुरावे मिळाले आहेत. ज्यातून स्पष्ट होतय की तुनिषासोबत ब्रेकअप केल्यानंतर आरोपी शीजान खान तिच्याशी फार बोलत नव्हता. तुनिषा त्याला सतत मॅसेज करायची, परंतु तो तिचे मॅसेज बघत नव्हता. तुनिषाच्या आईने पत्रकार परिषदे मध्ये सांगितले होते की, 24 डिसेंबरला शीजानने तुनिषाला मालिकेच्या सेटवर कानाखाली मारली होती. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी तुनिषाला उर्दू शिकण्यासाठी आणि हिजाब घालण्यासाठी देखील सांगत होता. दरम्यान, अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

- Advertisement -

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुनिषा आत्महत्या करण्यापूर्वी शीजानच्या मेकअप रुममध्ये गेली होती आणि काही वेळाने बाहेर आली. त्यानंतर शीजान सेटवर गेला तुनिषा त्याच्या मागे मागे गेली आणि अचानक अर्ध्यातून परत आली. पोलिसांनी सांगितलं की, या दरम्यान नक्कीच तुनिषा आणि शीजानमध्ये काहीतरी वादविवाद सुरु होता. परंतु शीजानने या गोष्टींना नकार दिला आहे.

तुनिषाची आत्महत्या नसून हत्या?
शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आई म्हणाली की, आत्महत्येच्या काही तास आधी तुनिषा आणि त्यांचं बोलण झालं होतं. त्यावेळी ती ख्रिसमस पार्टीसाठी 2 दिवस बाहेर जाणार असल्याचं म्हणाली होती शिवाय त्यावेळी ती खूप खूश होती. मग असं असताना अचानक तिच्या मनात आत्महत्येचा विचार कसा आला? कदाचित ही आत्महत्या नसून हत्या देखील असू शकते.

- Advertisement -

हेही वाचा :

तुनिषाची आत्महत्या नसून हत्या?…. आईचे शीजान आणि त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -