कान्स फिल्म फेस्टिव्हलनंतर फिफा वर्ल्डकपमध्ये देखील दीपिका पादुकोणचा जलवा

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ग्लोबल आयकॉन म्हणून देखील ओळखली जाते. तिने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. यावर्षी दीपिकाने कान्स फिल्म फेस्टिव्हलनंतरमध्ये देखील भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ज्यानंतर तिचे खूप कौतुक देखील करण्यात आले. दरम्यान, आता दीपिकाला फीफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ट्रॉफीचे अनावरण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दीपिका पादुकोण यंदा कतरमध्ये सुरु असलेल्या फीफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ट्रॉफीचे अनावरण करणार आहे. फीफा वर्ल्डकपचा फायनल 18 डिसेंबर 2022 रोजी आहे. यासाठी दीपिका लवकरच कतरसाठी रवाना होणार आहे. दरम्यान, अजून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

कान्स फिल्म फेस्टिव्हलनंतरमध्ये ज्यूरी मेंबर

दीपिकाने याचं वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलनंतरमध्ये देखील भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तो क्षण दीपिकासाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी खूप खास होता.

‘फायटर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे दीपिका
दीपिका सध्या तिच्या आगामी ‘फायटर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता ऋतिक रोशन देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहे. शिवाय या चित्रपटामध्ये अनिल कपूर देखील महत्वाच्या भूमिकेत आहे.या चित्रपटाव्यतिरिक्त दीपिका शाहरुख खानसोबत ‘पठाण’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. शिवाय ती प्रभाससोबत देखील एका चित्रपटामध्ये झळकणार आहे. तसेच ती रणवीर सिंहच्या ‘सर्कस’ चित्रपटामधील एका गाण्यामध्ये दिसणार आहे. त्यानंतर ती शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटामध्ये कॅमियो भूमिकेत दिसेल.

 


हेही वाचा :

2023 मध्ये स्क्रीनवर झळकताना दिसणार ‘या’ नवीन जोड्या