घर मनोरंजन दीपेश भानच्या मृत्यूनंतर अभिनेत्री सौम्या टंडनने फेडलं त्याचं 50 लाखांचे कर्ज

दीपेश भानच्या मृत्यूनंतर अभिनेत्री सौम्या टंडनने फेडलं त्याचं 50 लाखांचे कर्ज

Subscribe

दीपेशच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीवर कुटुंबासोबतच आर्थिक परिस्थिती खराब झाली होती. कारण, त्यांच्यावर 50 लाखाचे कर्ज होते. मात्र हे कर्ज फेडण्यासाठी भाभी जी घर पर है मालिकेतील अनीता भाभी म्हणजेच सौम्या टंडनने मदत केली आहे.

हिंदी टेलिव्हिजन प्रसिद्ध मालिका ‘भाभी जी घर पर है’ मधील मलखान खान ही भूमिका साकारणारा अभिनेता दीपेश भानचा नुकत्याच काही दिवसांपूर्वी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दिपेश भानच्या मृत्यूने फक्त त्याच्या कुटुंबासाच नाही तर मालिकेतील कलाकारांनी मोठ्ठा धक्का बसला आहे. दीपेशच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीवर कुटुंबासोबतच आर्थिक परिस्थिती खराब झाली होती. कारण, त्यांच्यावर 50 लाखाचे कर्ज होते. मात्र हे कर्ज फेडण्यासाठी भाभी जी घर पर है मालिकेतील अनीता भाभी म्हणजेच सौम्या टंडनने मदत केली आहे.

खरंतर, याबात दीपेशच्या पत्नीने स्वतः खुलासा केला आहे. तिने दीपेशच्या इंस्टाग्रामवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच या व्हिडीओमध्ये तिने सौम्या आणि ‘भाभी जी घर पर है’ मालिकेचे प्रोड्यूसर बिनाइफर कोहली यांचे देखील आभार मानले आहे.

- Advertisement -

दीपेशच्या पत्नीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिने सांगितलं की, “दीपेशच्या निधनानंतर मी भावनिक आणि आर्थिक दृष्ट्या खूप कमजोर झाले होते. कारण, आमच्यावर कर्ज होतं आणि माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता. परंतु माझ्या आयुष्यात सौम्याजी आल्या. त्यांनी माझी मदत केली. आज एका महिन्यामध्येच आम्ही कर्ज फेडलं. त्यांनी निधी उभारला आणि एका महिन्यामध्येच एवढा निधी उभा राहिला की पूर्ण कर्ज फिटलं गेलं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Saumya Tandon (@saumyas_world_)

खरंतर, अभिनेत्री सौम्या टंडनने सुद्धा स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की, “या मदत निधीमध्ये 4300 लोक त्यांची मदर करण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी जवळपास 43.52 लाख रूपये जमवले होते.” सौम्या टंडनने त्या सर्व लोकांचे आभार मानले होते.


हेही वाचा : ‘कौन बनेगा करोडपती 14’ मध्ये निखत झरीन आणि साइखोम मीराबाई चानू हॉटसीटवर

- Advertisement -
- Advertisement -
shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -