घरमनोरंजनसतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर उद्योगपतीने दिलं स्पष्टीकरण, व्हिडीओ शेअर करत म्हणाले...

सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर उद्योगपतीने दिलं स्पष्टीकरण, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

Subscribe

Satish Kaushik Death Case | प्रसिद्ध उद्योगपती विकास मालू यांच्या पत्नी सानवी यांनी या कौशिक यांच्या मृत्यूला विकास मालू यांना जबाबदार धरलं आहे. त्यामुळे सतीश कौशिक यांचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असल्याचं म्हटलं जातंय.

Satish Kaushik Death Case | नवी दिल्ली – अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती विकास मालू यांच्या पत्नी सानवी यांनी या कौशिक यांच्या मृत्यूला विकास मालू यांना जबाबदार धरलं आहे. त्यामुळे सतीश कौशिक यांचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असल्याचं म्हटलं जातंय. मात्र, यावर आता विकास मालू यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सतीश कौशिक यांना मी गेल्या ३० वर्षांपासून ओळखत आहे. पण लोकांनी आमच्या नात्यावर चिखलफेक करायला अजिबात वेळ लावला नाही, असं विकास मालू म्हणाले.

विकास मालू यांनी होळी पार्टीतील एक व्हिडीओ शेअर करत सर्व आरोपांना उत्तर दिले आहे. या व्हिडीओमध्ये सतीश कौशिकही दिसत आहेत. ते पंजाबी गाण्यावर नाचताना दिसत आहे. त्यांच्यासोबत विकास मालू आणि इतर अनेक लोकही तिथे उपस्थित आहेत. या होळी पार्टीच्या काही तासांनंतरच सतीश कौशिक यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

हेही वाचा – माझ्या पतीनेच केली सतीश कौशिकची हत्या.. महिलेच्या दाव्याने खळबळ

इन्स्टाग्राम पोस्टमध्ये विकास मालू यांनी लिहिलंय की, गेले ३० वर्षे मी आणि सतीश यांच्यात कौटुंबिक नातेसंबंध आहेत. पण माझ्यावर संशय घ्यायला लोकांना काही मिनिटेच लागली. खूप सुंदर सेलिब्रेशननंतर ही घटना घडली, जे मी अजूनही सहन करू शकत नाहीय. माझ्यावर लागलेल्या आरोपांविरोधात आता मी बोलणार आहे. घटना कधी सांगून घडत नाहीत. यावर कोणाचंच नियंत्रण नसतं. सर्वांच्या भावनांचा आदर केला पाहिजे, अशी मी विनंती करतो. मी प्रत्येक कार्यक्रमात सतीश यांची आठवण काढेन.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikas Malu (@vmkuber)

- Advertisement -


सानवी मालू यांचा दावा काय?

सानवी मालू यांनी दावा केला की, तिने 13 मार्च 2019 रोजी व्यावसायिकाशी लग्न केले होते. कौशिक यांच्याशी तिच्या पतीनेच ओळख करून दिली होती. यानंतर मी कौशिक यांना भारतात आणि दुबईमध्ये नियमित भेटत होते. 23 ऑगस्ट 2022 रोजी कौशिक दुबईतील तिच्या घरी आले होते आणि त्यावेळी त्यांनी तिच्या पतीकडून 15 कोटी रुपयांची मागणी केली होती. तक्रारीत महिलेने सांगितले की, कौशिक यांनी माझ्या पतीला गुंतवणुकीसाठी १५ कोटी रुपये देऊन तीन वर्षे झाली होती. मी ड्रॉईंग रूममध्ये हजर होते तेव्हा कौशिक आणि माझे पती दोघेही पैशांवरून वाद घालत होते. कौशिक सांगत होते की, मला पैशांची नितांत गरज आहे. कौशिक यांनी दिलेल्या पैशांत माझ्या पतीने कोणतीही गुंतवणूक केली नाही किंवा त्यांचे पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -