Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी The family man 2नंतर मनोज वाजपेयीचा नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार हटके अंदाज

The family man 2नंतर मनोज वाजपेयीचा नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार हटके अंदाज

Related Story

- Advertisement -

सध्या वेबसीरिजच्या दुनियेत ‘द फॅमिली मॅन २’ (The family man 2) या वेबसीरिजची चर्चा सुरू आहे. तसेच ‘द फॅमिली मॅन २’ सिरीजमध्ये प्रमुख भूमिका निभावणार अभिनेता मनोज बायपेयीच्या अभिनयाचे देखील कौतुक केले जात आहे. आता मनोज वाजपेयी Amazon prime videoनंतर आता Neflixवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. नेटफ्लिक्सवरील चित्रपटात मनोज वाजपेयी हटके अंदाजात दिसणार आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीची जागतिक पातळीवर मान उंचावणारे ऑस्कर पुरस्कारविजेते लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या कथेवर आधारित हा एक अँथोलॉजी चित्रपट आहे. यामध्ये चार वेगवेगळ्या कथा चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केल्या आहे. यामधल्या एका कथेमध्ये मनोज वाजपेयी गझल गायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘रे’ असे आहे.

- Advertisement -

आज मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला गेला. ट्रेलरमध्ये चार कथेमधील प्रमुख भूमिका निभावणाऱ्यांची ओळख करू दिली आहे. मनोज वाजपेयी व्यतिरिक्त केके मेनन, अली फझल आणि हर्षवर्धन कपूर चार वेगवेगळ्या कथेचे प्रतिनिधित्व करत आहेत. हा चित्रपट २५ जूनला प्रदर्शित होणार आहे.

मनोज वाजपेयीच्या कथेचे शीर्षक ‘हंगामा है क्यों बरपा’, केके मेननच्या कथेचे शीर्षक ‘बहरूपिया’, अली फझलच्या कथेचे शीर्षक ‘फॉरगेट’ आणि हर्षवर्धन याच्या कथेचे शीर्षक ‘स्पॉटलाईट’ असे आहे. एकाच चित्रपटात चार वेगवेगळ्या कथा पाहायला मिळणार आहेत. सत्यजीर रे यांच्या कथेचे चित्रपटात रुपांतर केले आहे. श्रीजीत मुखर्जी, अभिषेक चौबे आणि वासन बाला यांनी हा चित्रपट दिग्दर्शत केला आहे. यापूर्वी अँथोलॉजी चित्रपट लूडो हा प्रक्षेकांच्या भेटीस आला होता.

पाहा चित्रपटाचा ट्रेलर

- Advertisement -

- Advertisement -